news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सेवापूर्ती ! मंगळवेढ्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे 35 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर आज सेवानिवृत्त होणार 

टीम लोकमन by टीम लोकमन
May 31, 2024
in शैक्षणिक
0
सेवापूर्ती ! मंगळवेढ्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे 35 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर आज सेवानिवृत्त होणार 

टीम लोकमन मंगळवेढा |

मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे हे त्यांच्या 35 वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून आज निवृत्त होत आहेत. कार्यतत्पर व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ओळख असलेल्या लवटे यांना त्यांच्या सेवाकाळात शासन व विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या वतीने पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मंगळवेढ्याचे गटशिक्षणाधिकारी असलेले पोपटराव लवटे हे मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावचे सुपुत्र असून त्यांनी 1989 साली लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे येथे सहशिक्षक म्हणून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर ते पंढरपूर येथील गौतम विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे सलग सहा वर्ष ज्ञानदानाचे अविरत कार्य केल्यानंतर त्यांची जिल्हा निवड मंडळाकडून शिक्षण विस्तार अधिकारी पदावर निवड झाली.

शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर येथे झाली. तेथे एक वर्ष उल्लेखनीय कामगिरी करून ते बदलीने मंगळवेढा पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून 1997 ला रुजू झाले. त्यानंतर 2012 पर्यंत सलग पंधरा वर्षे ते मंगळवेढा येथे अविरतपणे कार्यरत होते. या पंधरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी अतिशय उठावदार काम केले आणि ते अल्पावधीतच मंगळवेढ्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आले.

सन 2012 मध्ये त्यांना पुन्हा पंढरपूर पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बदलीने रुजू व्हावे लागले. तेथे पुन्हा 2019 पर्यंत सलग सात वर्षे त्यांनी आपल्या कार्याची झलक दाखवली. त्यानंतर 2019 मध्ये ते मंगळवेढा पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले 2019 ते 31 मे 2024 पर्यंत मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात मंगळवेढ्याचा शैक्षणिक आलेख सातत्याने उंचावत राहिला.

त्यांना त्यांच्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यामध्ये त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, सोलापूर जिल्हा परिषदेचाच आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कार, सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कार, प्राथमिक शिक्षक संघाकडून दिला जाणारा आदर्श अधिकारी पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला. याशिवाय उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अधिकारी असून सुद्धा 35 वर्षांची प्रदीर्घ सेवा ही पंढरपूर आणि मंगळवेढा या दोनच तालुक्यांमध्ये घरापासून अगदी जवळच अंतरावर त्यांना करता आली. त्यामुळे ते नशीबवान अधिकारी आहेत अशीही चर्चा अनेक वेळा होत असते. आज 31 मे रोजी पोपटराव लवटे हे त्यांच्या पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहेत. जरी ते शासकीय सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांनी आपल्या कौशल्याचा, बौद्धिक चातुर्याचा, वलयाचा वापर यापुढेही मंगळवेढा तालुक्याचा शैक्षणिक आलेख अधिकच उंच व्हावा यासाठी करावा हीच अपेक्षा. त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य अतिशय आरोग्यदायी लाभो आणि जास्तीत जास्त शैक्षणिक सेवा त्यांच्या हातून घडो. हीच news87lokman च्या वतीने मनःपूर्वक सदिच्छा.

Previous Post

सीईओ मॅडम ॲक्शन मोडवर ! जल जीवन मिशनच्या कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकणार ; १० ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित

Next Post

वीस वर्षानंतर सवंगडी एकत्र आले आणि रंगला स्नेहमेळावा ; उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांचीही उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group