news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा ; लोकसभा निवडणूक निकालानंतर मोठा राजकीय निर्णय घेणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
May 31, 2024
in ताज्या घडामोडी, राजकीय
0
राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा ; लोकसभा निवडणूक निकालानंतर मोठा राजकीय निर्णय घेणार?

 

टीम लोकमन मंगळवेढा |

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्यं पाहिल्यास ते महायुतीवर नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. याबाबत त्यांना विचारले असता, मी नाराज नाही पण मी विरोधासाठी विरोध करत नाही, असे स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिले.

तरीही भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना वरचेवर बळच मिळत आहे. चर्चेचा जोर काही कमी होताना दिसत नाही. या सगळ्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला तेव्हापासूनच झाली. भाजप नेतृत्वही छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अनुकूल होते. मात्र शिंदे गट या जागेसाठी शेवटपर्यंत अडून बसल्याने छगन भुजबळ यांची लोकसभा लढण्याची इच्छा अधुरीच राहिली. तेव्हापासूनच छगन भुजबळ यांचे बिनसल्याचे पाहायला मिळत आहे.

छगन भुजबळांच्या नाराजीचे कारण काय?

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक लोकसभेची जागा न मिळाल्यामुळेच छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते. नाशिकमधून लोकसभेला उभं राहण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतरच छगन भुजबळ यांनी महायुतीला अडचणीत आणणारी वक्तव्य करायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी एकापाठोपाठ एक महायुतीच्या भूमिकेशी विसंगत असणारी वक्तव्ये केली आहेत. महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या कृतीनंतर भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात रान उठवले होते. आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन आणि त्यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र आव्हाडांकडून ही कृती अजाणतेपणाने घडली असून त्यामुळे मनुस्मृतीच्या मूळ मुद्द्यावरुन लक्ष भरकटता कामा नये असे सांगत छगन भुजबळ यांनी आव्हाडांची एक प्रकारे पाठराखणच केली होती. त्यामुळे भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांनी आव्हाडांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनातील हवाच निघून गेली होती.

छगन भुजबळांची महायुतीची डोकेदुखी वाढवणारी वक्तव्ये

१) लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या ४०० पारच्या नाऱ्याचा फटका बसला’

२) लोकसभेला जागावाटपात घटक पक्षांकडून दबाव तंत्राचा वापर झाला, तो आता राष्ट्रवादीच्या बाबत विधानसभेला व्हायला नको.

३) विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा राष्ट्रवादीला आम्ही देऊ, असं आश्वासन सत्तेत सहभागी होताना भाजपने दिलं आहे. त्याची आठवण त्यांना करुन द्या.

छगन भुजबळ पुन्हा महाविकास आघाडीच्या वाटेवर?

छगन भुजबळांची महायुतीला डोकेदुखी वाढवेल अशी वक्तव्यांची मालिका सुरु असताना दुसरीकडे महाविकास आघाडीशी जवळीकता साधता येईल, अशी वक्तव्यही भुजबळांनी केल्याचे पाहायला मिळते. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजपचे नेते सातत्यानं ज्यांच्यावर टीका करत होते त्या उद्धव ठाकरे यांचीच पाठऱाखण भुजबळांनी केल्याचे पहायला मिळाले.

तर दुसरीकडे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ज्यांची ओळख असलेल्या जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेब आंबेडकर प्रकरणात समोर येऊन पाठराखण करुन स्वत:साठी शरद पवार गटाचा रस्तादेखील छगन भुजबळांनी खुला केल्याची चर्चा रंगू लागली आहे.

एकीकडे आव्हाडांची छगन भुजबळ यांनी पाठराखण केली तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची संघटना असणाऱ्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीविरोधात जोरदार आंदोलने राज्यभरात करून आव्हाड यांच्या विरोधातील विरोध कमी केल्याचंच पाहायला मिळत आहे. एकंदरीत 4 जूनच्या निकालानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं बळ वाढल्यास छगन भुजबळ महाविकास आघाडीची वाट धरतील अशी चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे.

Previous Post

जत तालुक्यातील माडग्याळ येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

क्रांतिकारी कॉम्रेड कल्लाप्पाण्णा होर्ती यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त उमदी येथे आज मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Next Post
सोमवारी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन

क्रांतिकारी कॉम्रेड कल्लाप्पाण्णा होर्ती यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त उमदी येथे आज मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group