news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

स्व. महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान सोहळा ; आमदार समाधान आवताडे, इंद्रजीत देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
June 11, 2024
in सामाजिक
0
स्व. महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान सोहळा ; आमदार समाधान आवताडे, इंद्रजीत देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती

टीम लोकमन मंगळवेढा |

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक १३ जून रोजी दुपारी १.१५ वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांच्या या सन्मान सोहळ्यासाठी माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. इंद्रजीत देशमुख हे उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी बी. आर. माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक रणजित माने, तहसीलदार मदन जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, मंगळवेढा पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम, मंगळवेढ्याचे प्रभारी गटशिक्षणधिकारी बिभिषण रणदिवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील सामाजिक, सांप्रदायिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या प्रतिष्ठानने अनेक कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी अशा स्वरूपामध्ये सन्मानित केले जाणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील या गुणवंताच्या सन्मान सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्वच शाळा, कॉलेज, संस्था पदाधिकारी, प्राचार्य मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?

Next Post

अखिल भारतीय होलार समाज संघटनेची पुनर्बांधणी होणार ; तरुणांच्या नव्या उमेदीने समाज संघटनेच्या चळवळीला मिळणार टोकाची धार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group