टीम लोकमन मंगळवेढा |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी (डोंगरगाव) तालुका मंगळवेढा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समाधान सिताराम इंगळे तर उपाध्यक्षपदी अन्सार इमाम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मोरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली असून पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यासाठी मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समाधान सिताराम इंगळे तर उपाध्यक्षपदी अन्सार इमाम पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष निसार पठाण, अर्जुन पाईपचे संचालक दत्ता भुसे, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ इंगळे, मुख्याध्यापक रमेश दुधाळ, उपशिक्षक पांडुरंग शिंदे, उपशिक्षिका सुषमा सुतार, पदवीधर शिक्षक भास्कर दुधांबे यांचेसह पालक व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.









