news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

राज्यात पुन्हा सैराट ! बापानेच भर लग्नात मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या, सजलेला मंडप झाला काही क्षणातच सामसूम ; सैराटच्या पुनरावृत्तीने महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन by टीम लोकमन
April 27, 2025
in क्राईम
0
राज्यात पुन्हा सैराट ! बापानेच भर लग्नात मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या, सजलेला मंडप झाला काही क्षणातच सामसूम ; सैराटच्या पुनरावृत्तीने महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत असून जिल्ह्यातील चोपडा शहरातील मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर एका लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये धडाधड गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला आहे. ही घटना चोपडा शहरातील डॉ.आंबेडकर नगर परिसरात काल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तृप्ती अविनाश वाघ (वय-24) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर किरण अर्जुन मंगले (वय 48, रा.शिरपूर) असे आरोपी वडिलांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तृप्तीने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय 28, दोधे रा.करवंद, शिरपूर, सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी वडील किरण मंगले याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते. बहिणीच्या हळदीसाठी लेक आणि जावई त्याठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली.

अविनाश याच्या बहिणीची हळद काल शनिवारी (दि.26) चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकरनगर येथे होती. त्या निमित्ताने ते चोपडा येथे आले होते. त्यात तृप्तीने प्रेम विवाह केल्याचा राग वडील निवृत्त सीआरपीएफ जवान किरण मंगले यांच्या मनात होता. हळद सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत मुलगी तृप्तीचा मृत्यू झाला आहे. तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या वडिलाला मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनीही चोपड्यात जाऊन सदर घटनेची माहिती घेतली.

Previous Post

दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढ्यात 1 मे पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन : ॲड. सुजित कदम

Next Post

मोठी बातमी ! कांदा काढण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या पिकअपला अपघात, 3 महिला जागीच ठार तर 15 महिला जखमी ; कामगार दिनादिवशीच कामगारांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

Next Post
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! कांदा काढण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या पिकअपला अपघात, 3 महिला जागीच ठार तर 15 महिला जखमी ; कामगार दिनादिवशीच कामगारांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group