news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चा ‘सिनर्जी’ हा डिस्ट्रिक्ट टीम लर्निंग सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न ; 11 जिल्ह्यांमधील रोटरीचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर उपस्थित

टीम लोकमन by टीम लोकमन
April 9, 2025
in सामाजिक
0
पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चा ‘सिनर्जी’ हा डिस्ट्रिक्ट टीम लर्निंग सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न ; 11 जिल्ह्यांमधील रोटरीचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर उपस्थित

टीम लोकमन पंढरपूर |

दिनांक 5 व 6 एप्रिल 2025 रोजी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या वतीने DTLS म्हणजेच डिस्ट्रिक्ट टीम लर्निंग सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी आर आय डायरेक्टर रो. डॉ. महेश कोटबागी, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रो. प्रवीण स्वामी हे उपस्थित होते. अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे 2025-26 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे यांनी दिली.

या कार्यक्रमात बोलताना रो. डॉ. महेश कोटबागी यांनी रोटरीचे जगभरातले काम व भारतातले काम आणि त्यामुळे समाजात होणारा सकारात्मक बदल याविषयी भाष्य केले. रोटरीमुळे अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जो बदल अपेक्षित आहे त्यासाठी प्रत्येक रोटेरियन यांनी मनापासून काम करणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतातील रोटरी ही जगाच्या नकाशावर अगदी ठळकपणे सर्व रोटेरियन कामातून दिसत आहे व रोटरीने जगाच्या पोलिओ निर्मूलनामध्ये जे योगदान दिले आहे ते इतिहासामध्ये अगदी ठळकपणे अधोरेखित झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रो. प्रवीण स्वामी यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षापासून रोटरीच्या माध्यमातून जे सामान्य माणसांचे प्रश्न मी सातत्याने सोडवत गेलो त्यामुळे एका सामान्य शिक्षकाला रोटरीच्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाता आले ही रोटरीच्या सामाजिक कार्याची ताकद आहे.

DGE रो. सुधीर लातूरे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना पुढील वर्षी रोटरीच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले जाणार आहेत त्याची माहिती दिली व उपस्थित सर्व रोटेरियन यांना समाजातील मूलभूत प्रश्नावरती काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी PDG रो. डॉ. राजीव प्रधान, रो. इस्माईल पटेल, रो. जुबीन अमारिया, रो. किशोर पावडे, रो. शिरीष रायते, रो. मोहन देशपांडे, रो. डॉ. दीपक पोफळे, रो. हरिष मोटवानी, रो. डॉ. ओमप्रकाश मोतीपावळे, IPDG रो. स्वाती हेरकल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबू, DGN रो. जयेश पटेल हे उपस्थित होते. या सर्वांनी वेगवेगळ्या सत्रांच्या मार्फत उपस्थित सर्व रोटेरीयन्स यांचे वेगवेगळ्या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी रो. डॉ. कैलाश करांडे यांनी कन्व्हेनर म्हणून काम पाहिले. रो. लितेश शहा यांनी फोरम लीडर म्हणून काम पाहिले.

रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष रो. सोमेश गानमोटे यांच्यासह पंढरपूर रोटरी क्लबचे सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. रो. नितीन कुदळे, रो. रवींद्र बनकर, रो. हमीद शेख, रो. यशवंत हांडे, रो. प्रसाद वरद, रो. विशाल जैन या सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Previous Post

सोनी तालुका मिरज येथील इंदुमती जगन्नाथ जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post

कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश ; 28 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group