news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

माढ्यात रणजीतसिंह शिंदे विरुद्ध मिनल साठे असा सामना होणार? मिनल साठेंनी घेतली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

टीम लोकमन by टीम लोकमन
June 19, 2024
in राजकीय
0
माढ्यात रणजीतसिंह शिंदे विरुद्ध मिनल साठे असा सामना होणार? मिनल साठेंनी घेतली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

 

टीम लोकमन मंगळवेढा |

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय ठरणारा माढा लोकसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीत देखील चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कारण या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुन व माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


सध्या माढा विधानसभा मतदारसंघाचे बबनदादा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढ्यात रणजितसिंह शिंदे विरुद्ध मिनल साठे असा सामना होणार असल्याचे बोलले जात आहे. मिनल साठे यांनी सांगलीत जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. पण ही भेट सदिच्छ भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिनल साठे यांनी दिली. मात्र या भेटीमागे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत. माढ्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले कुटुंब म्हणून ओळखले जाते. मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्याने साठे कुटुंबाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र पुन्हा ते स्वगृही परतले आहेत.


माढ्यात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात सामना होणार?

सध्या माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे दररोज तालुक्यातील विविध गावांना भेटी देत आहेत. लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तसेच मिनल साठे देखील गावोगाव दौरे करत आहेत. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ही जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. कारण माढा तालुक्यात साठे यांच्याशिवाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांचे देखील अस्तित्व आहे. त्यांचे साखर कारखाने, बँका, शिक्षणसंस्था आहेत. ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे देखील सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. तसेच शरद पवार गटात संजय पाटील घाटणेकर, संजय कोकोटे हे देखील सक्रिय आहेत. त्यामुळे शिंदेच्या विरोधात कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आमदार बबनदादा शिंदे सलग सहा वेळा विधानसभेवर

आमदार बबनदादा शिंदे यांचा माढा विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. सलग सहा वेळा ते माढा विधानसभेच्या निवडणुकीत निवडूण आले आहेत. साखर कारखाने, बँका, बाजार समित्या, जिल्हा दुध संघ या मोठ्या संस्थावर बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्याचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे सध्या सोलापूर जिल्हा दुध संघाचे चेअरमन आहेत. तसेच बबनदादा शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. यामुळे शिंदे कुटुंबियांचा माढा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे.

मोहिते पाटलांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीनंतर माढ्यात राजकीय समीकरणं बदलणार का? असा सवालही उपस्थित केला जातोय. कारण लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर उभे होते. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मैदानात होते. या निवडणुकीत मोहिते पाटलांनी मोठ्या मताधिक्क्यानी निंबाळकरांचा पराभव केला होता. यामध्ये विशेष बाब म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांना 52000 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघावर आमदार शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील कोणाला पाठिंबा देणार की, त्यांच्याच परिवारातील उमेदवार उभा करणार? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल.

अभिजीत पाटील काय भूमिका घेणार?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अभिजीत पाटील काय भूमिका घेणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. कारण शरद पवारांचे खद्दे समर्थक म्हणून अभिजीत पाटील यांची ओळख होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांचे काम केले. राज्य सरकारने त्यांच्या ताब्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी लोकसभेला भाजपला मदत केली होती. मात्र आता विधानसभेला ते काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. कारण ते देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. सध्या माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील मते सुद्धा महत्वाची ठरतात. अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील आहेत. त्यामुळे ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Previous Post

राज्यातील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मंत्रालयातून आदेश जारी ; आता मुंढेंच्या खांद्यावर ‘या’ खात्याची धुरा 

Next Post

भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत जुंपली, थेट वेगळी चूल मांडण्याची राष्ट्रवादीची धमकी ; वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची एंट्री

Next Post
भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत जुंपली, थेट वेगळी चूल मांडण्याची राष्ट्रवादीची धमकी ; वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची एंट्री

भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत जुंपली, थेट वेगळी चूल मांडण्याची राष्ट्रवादीची धमकी ; वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची एंट्री

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group