news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

डोणज येथील युवक नेते राकेश पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी निवड

टीम लोकमन by टीम लोकमन
January 24, 2025
in राजकीय
0
डोणज येथील युवक नेते राकेश पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी निवड

टीम लोकमन मंगळवेढा |

पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख तथा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चु कडू यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. डोणज येथील राकेश पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

राकेश पाटील हे माजी मंत्री बच्चू कडू यांचा विश्वासू सहकारी व लिंगायत समजाचा महत्वाचा चेहरा म्हणून मंगळवेढा तालुक्यात ओळख निर्माण केली आहे. राकेश पाटील यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा डोणज शाखाध्यक्ष पदापासून कार्यास सुरवात केली. ते आज तालुकाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहेत. राकेश पाटील यांनी प्रहारच्या माध्यमातून पूर्व भागातील अनेक प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

दूध दरवाढीसाठी तसेच दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केली तसेच राष्ट्रीय महामार्ग 166 भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यात आला. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांच्या विरोधात आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात आला. महात्मा बसवेश्वर स्मारक मंगळवेढा येथे होण्यासाठी नेहमीच राकेश पाटील आग्रही भूमिका मांडत असतात.

गावातील तरुणांना एकत्र करून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंगळवेढा तालुक्यातील पिक विमा, दिव्यांग निधी, अतिवृष्टी, गावातील उत्सव यासाठी ते प्रयत्नशील असतात तसेच तालुक्यातील अपंग, विधवा, निराधार, शेतकरी, विद्यार्थी,कामगार व मजूर यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच राकेश पाटील यांनी गेल्या 6 वर्षात पक्षाचे ध्येय धोरण तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचवले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष वाढीसाठी ते प्रयत्न करत असतात त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा मंगळवेढा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी राकेश पाटील यांच्याकडे सोपवली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राकेश पाटील बोलताना म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्ष ह्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामाची तसेच सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व आगामी ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या ताकदीने लढवण्यासाठी माझी नियुक्ती केलेली असून या तालुका अध्यक्षपदाचा मी सर्वसामान्य जनतेसाठी व त्यांच्या कल्याणासाठी उपयोग करणार आहे.

सदर निवडीचे पत्र देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख बच्चू भाऊ कडू, सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे व सर्व मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राकेश पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

Previous Post

सांगण्याजोगे ! जलजीवन मिशन योजनेमुळे थांबली पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती ; युवा सरपंचाने सोडविला आश्रमशाळा तांडा तांबेवाडी येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

Next Post

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने मंगळवेढा येथे सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group