टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे मुक्ताई डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी होणार असल्याची माहिती मुक्ताई डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक व सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. रविशंकर हिंगमिरे यांनी दिली.
अतिशय ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा शहरात वैद्यकीय क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स आणि सुसज्ज हॉस्पिटल्स मंगळवेढ्यात उपलब्ध नव्हती. विविध चाचण्यांसाठी येथील रुग्णांना पंढरपूर, सोलापूर व मिरज सारख्या शहरांमध्ये जावे लागत होते. परंतु गेल्या सात वर्षांमध्ये मंगळवेढा शहरात वैद्यकीय क्षेत्राचा विकास मोठ्या वेगाने होताना दिसत आहे. यामध्ये आता मुक्ताई डायग्नोस्टिक सेंटरची भर पडत असून मंगळवेढा व परिसरातील रुग्णांना आता अधिक जलद आणि अचूक असे निदान या सेंटरच्या माध्यमातून करता येणार आहे.
रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुक्ताई डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचेहस्ते होत असून या उद्घाटन सोहळ्यासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे मंगळवेढा अध्यक्ष व सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. मधुकर कुंभारे, नॅशनल इंटेग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष डॉ. सुभाष देशमुख, होमिओपॅथी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. शाकीर सय्यद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नागणे कॉम्प्लेक्स, कल्याणप्रभू चौक, हॉटेल राजयोग शेजारी, कारखाना रोड मंगळवेढा येथे सुरू होत असलेल्या रेडिओलॉजिस्ट डॉ. रविशंकर हिंगमिरे यांच्या मुक्ताई डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मारुती संभाजी हिंगमिरे, वनमाला मारुती हिंगमिरे, डॉ. रविशंकर मारुती हिंगमिरे, डॉ. आरती रविशंकर हिंगमिरे यांनी केले आहे.