टीम लोकमन मंगळवेढा |
पुण्याच्या कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात पोलिसांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येरवड्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अपघाता संदर्भात माहिती वरिष्ठ आधिकारी आणि कंट्रोल रूमला न दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर राज्यातील राजकारण देखील भलतंच तापलं आहे. राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर या अपघातानंतर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात आता निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठांना आणि कंट्रोल रूमला न कळवल्याने मोठी कारवाई करण्यात आली आहे.
येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही. असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत, तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही. असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे कर्तव्यावर होते.
काय आहे संपुर्ण प्रकरण?
हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शेने चिरडले होते. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींवर जामीनही मिळाला.
न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. मात्र आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या तो अल्पवयीन सुधारगृहात आहे.









