टीम लोकमन पंढरपूर |
कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिक अद्विक 2024 चे प्रकाशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर व तारापाका विद्यापीठ चिलीचे प्रा. डॉ. एडुआर्दो गॅल्वेझ सोटो, झागाझीग विद्यापीठ इजिप्तचे प्रा. डॉ. एम. ए. तौफिक यांच्या हस्ते संपन्न झाल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून महाविद्यालयात नियमित पणे विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या विचारांना व्यक्त करण्यासाठी “अद्विक” या नियतकालिकाचे प्रकाशन केले जाते. अव्दिक नियतकालिकात मायबोली, प्रयास, अभिमान, इंग्रजी व कलाव्दिक इ. विभागात विदयार्थ्यांनी वैचारिक लेखन केलेले आहे. यावर्षीचे नियतकालिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकशित करण्यात आले. या नियतकालिकासाठी डॉ. संपत देशमुख यांनी प्रमुख संपादक, डॉ. दिपक गानमोटे संपादक, गीतांजली देशमुख, प्रतीक कुलकर्णी, वैष्णवी पाटील, श्वेता पाटील, वैष्णवी माने, श्रावणी बुचके, कीर्ती पुजारी, कोमल जाधव, उमामा बेदरेकर आणि शरयू जोशी यांनी विद्यार्थी संपादक म्हणून काम पहिले.
या प्रकाशनाच्या सोहळयास उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे यांचेसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.