टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून प्रतिवर्षी दिला जाणारा कृतिशील शाळा पुरस्कार यावर्षी मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेला जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीमार्फत दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत उल्लेखनीय कार्य केलेल्या शाळांना कृतिशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुणे विभागाचे माजी विधान परिषद सदस्य व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेच्या वैविध्यपूर्ण कार्याची व गेल्या वर्षी 2023-24 रोजी भारत सरकार मान्यता प्राप्त ‘राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ’ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने प्रशालेला मिळालेल्या ‘आदर्श शाळा पुरस्कार’ याची दखल घेऊन विविध उपक्रम राबविल्या बद्दल कृतिशील शाळा म्हणून निवड झाल्याचे पत्र प्रशालेस दिले आहे.
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेचे विश्वस्त व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. सौ.पुष्पांजली शिंदे, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे यांनी संस्थेच्या व शाळेच्या कामाची महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने दखल घेऊन शाळेस पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे व माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांचे आभार मानले.
सदर कृतिशील शाळा पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सिंहगड कॉलेज कोर्टी तालुका पंढरपूर येथे सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
प्रशालेस हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य सुधीर पवार व त्यांच्या संपूर्ण टीमचे मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी, सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोरुलकर, बालरोगतज्ञ डॉ. महेश कोनळी, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, भारतीय जनता पार्टीचे युवक नेते संतोष कोळसे, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. दशरथ फरकंडे,
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी, सेक्रेटरी अभिजीत बने, डॉ. प्रथमेश बाबर, डॉ. निखिल गायकवाड, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. शरदिनी काळे, व्यवस्थापक संजय शिवशरण, प्रवीण पवार, गुरुनाथ शिवशरण, नितीन घाटुळे, गणेश कोरे, सुशील कसबे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर मल्लय्या स्वामी, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक प्रा. सागर पाटील यांनी अभिनंदन केले.