news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

अभिमानास्पद ! मंगळवेढ्याचे सुपुत्र व सोलापूर जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती ; मुंबई येथे शिक्षण निरीक्षकपदी नियुक्ती

टीम लोकमन by टीम लोकमन
October 3, 2024
in ताज्या घडामोडी
0
अभिमानास्पद ! मंगळवेढ्याचे सुपुत्र व सोलापूर जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती ; मुंबई येथे शिक्षण निरीक्षकपदी नियुक्ती

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षणाधिकारी तथा शिक्षण निरीक्षकपदी बृहन्मुंबई, पश्चिम विभाग मुंबई येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.

उपशिक्षणाधिकारी संजय ज्ञानदेव जावीर यांची 2011 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधून गटशिक्षणाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे गटशिक्षणाधिकारीपदी काम केले आणि 2020 पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

याठिकाणी शिक्षणाधिकारी पदाचा पदभारही त्यांनी 11 महिने यशस्वीरित्या सांभाळला आहे. सध्या उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) या पदाबरोबरच सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे.

संजय जावीर यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड होण्यापूर्वी ते मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल येथे 17 वर्षे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांचा एक आदर्श शिक्षक म्हणून संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात मोठा नावलौकिक होता. त्यांचे वडिल ज्ञानदेव जावीर हे देखील शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनीही सोलापूर जिल्हा परिषद व सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी पदावर काम केले आहे आणि आज त्याच पदावर त्यांचे चिरंजीव उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनाही काम करण्याचा योग आला आहे. राज्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलाला शिक्षणाधिकारी होण्याचा मान मंगळवेढ्यातील पिता पुत्रांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या पदोन्नतीबद्दल मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले, उपायुक्त तैमूर मुलाणी, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप आदींनी अभिनंदन केले.

Previous Post

मोठी बातमी ! महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांचे 388 कोटी रुपये थकवले ; युनायटेड इंडिया इन्शुरन्स सोबतचा 3 हजार कोटी रुपयांचा करार राज्य शासनाकडून रद्द

Next Post

मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार समाधान आवताडे

Next Post
विकासाच्या वाटेवरचे समाधान ! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार समाधान आवताडे 

मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार समाधान आवताडे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group