टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील रहिवासी आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा जिल्हा रत्नागिरी येथे गणित व संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. धनंजय मधुकर क्षीरसागर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची संख्याशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.

प्रा.धनंजय क्षीरसागर यांनी “Some Contributions to Control Charts” या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या पीएचडीच्या मौखिक परीक्षेसाठी परीक्षक म्हणून कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील डॉ. सतीश काकडे व डॉ. मेंते होते. प्रा. डॉ. धनंजय क्षीरसागर यांच्या या यशाबद्दल पीएचडीचे मार्गदर्शक डॉ. विकास घुटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी संशोधनकामी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत भाऊ शेटे,उपाध्यक्ष सुनील कुरूप, सचिव महेश सप्रे, संस्थेचे सहसचिव राजेश शेटे, संचालक महम्मद शेठ रखांगी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वंजारे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजाचे प्राचार्य डॉ.अरविंद कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. काशिनाथ चव्हाण, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
प्रा. डॉ. धनंजय क्षीरसागर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदेश्वर व माध्यमिक शिक्षण बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर (के.बी.पी. कॉलेज) येथे झाले. ते संख्याशास्त्र विषयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम.एस.सी. झाले आहेत. नंदेश्वर सारख्या ग्रामीण भागात अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण मोठ्या जिद्दीने पूर्ण केले.
मंगळवेढा तालुक्यातील नाभिक समाजामधील डॉक्टरेट मिळवणारे कदाचित ते पहिलेच प्राध्यापक असावेत. त्यांनी प्राप्त केलेल्या या उत्तम यशाबद्दल सौ. प्रमोदिनी क्षीरसागर, डॉ. धीरज क्षीरसागर, प्रेरणा क्षीरसागर, भूमिका क्षीरसागर, प्रा. विजय क्षीरसागर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्राप्त केलेले यशाबद्दल संपूर्ण मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील नाभिक बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.















