टीम लोकमन मंगळवेढा |
कै.रामगोंडा बापुराया चौगुले बहुउद्देशिय संस्था, सिध्दापूर संचलित, आर.बी.सी. इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तांडोर-सिध्दापूर ता.मंगळवेढा, जि. सोलापुर आयोजित सिध्दापूर फेस्टीव्हल-2025 चा पत्रकारिता क्षेत्रातील जनमित्र आदर्श पत्रकार पुरस्कार प्रमोद बिनवडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सिध्दापूर येथील आर.बी.सी. प्रशालेच्या प्रांगणात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सौ.अंजलीताई समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णा चौगुले होत्या.
पत्रकार प्रमोद बिनवडे यांनी नेहमीच उपेक्षित व अन्यायग्रस्त वर्गासाठी आपली पत्रकारिता केली असून या सर्व गोष्टीची दखल म्हणून व पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून चांगले करत असताना त्यांना नवी दिल्ली येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोसिप पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार, मंगळवेढा येथून चालणाऱ्या दै.दामाजी न्युज चॅनलचा व साप्ताहिक मंगळवेढा दणकाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाले असुन आता सिद्धापूर फेस्टिवलचा आदर्श पत्रकार पुरस्कारही प्रमोद बिनवडे यांना प्राप्त झाला आहे.
या कार्यक्रमास मंगळवेढा पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सिध्दराया चौगुले, स्मिता म्हमाणे, संस्थेच्या सचिव मिनाक्षी पाटील, सौ.गायकवाड, उपसरपंच सचिन चौगुले, चंद्रकांत पाटील, गजानन चौघुले, सचिन नकाते, संजीव कवचाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थापक गजानन पाटील सर यांनी केले. सुत्रसंचलन संतोष मिसाळ यांनी तर आभार सौ. पाटील यांनी मानले.








