टीम लोकमन ब्रह्मपुरी |
“सेवा,सुरक्षा अन् कर्तव्याशी एकसंघ” हे ब्रीद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना म्हणून कार्यरत असलेल्या मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी साप्ताहिक रणयुग टाइम्सचे संपादक प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी साप्ताहिक मंगळवेढा दिशाचे संपादक महादेव धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोलापूर येथील सुंदर मल्टिपर्पज हाॅल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बिनवडे व धोत्रे यांना मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. हि निवड एका वर्षासाठी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष किरण जोशी म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणकारी योजना आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ही मराठी पत्रकार संघटना प्रामुख्याने काम करत असून राज्यातील पत्रकारांची सेवा व सुरक्षा यांच्याशी कायम बांधील राहिलेली ही संघटना असून येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीने सर्व स्तरातील पत्रकारांसाठी विविध उपक्रम व योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश पटवारी, प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे, खजिनदार विवेक इनामदार, पंढरपूर तालुकाध्यक्ष मिलिंद यादव, सांगोला तालुकाध्यक्ष किशोर म्हमाणे, मोहोळ तालुकाध्यक्ष किशोर मारकड, बालाजी शेळके, पंढरपूर शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल, पंढरपूर शहर सहध्यक्ष विनोद पोतदार, कृष्णकांत चव्हाण, सौरभ वाघमारे, संकेत किल्लेदार यांचेसह सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.