जत : पांडुरंग कोळळी
भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे व उमराणीचे संस्थानिक अमोलसिंह डफळे यांनी सहभागी होऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.
खोजनवाडी गावात जनकल्याण संवाद पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी व वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. अनेक महिलांनी राखी बांधून तम्मनगौडा रविपाटील यांचे औक्षण केले. येथील श्री माधवानंद प्रभू मठात संवाद सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाशराव जमदाडे यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
त्यांच्यासोबत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, माजी नगरसेवक मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत जनकल्याण संवाद यात्रेचे संयोजक निवृत्ती शिंदे सरकार, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार यांची भाषणे झाली.
तम्मनगौडा रवीपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेत उमराणीचे संस्थानिक अमोलसिंह डफळे हेही सहभागी झाले. अमोलसिंह डफळे हे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे तत्कालीन ओएसडी, जत सहकार विभागाचे सहायक निबंधक आहेत. डफळे मेंढेगीरी ते खोजानवाडी दरम्यान पदयात्रेत सहभागी झाले होते.








