news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ व शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी डोणज येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे रास्ता रोको आंदोलन

टीम लोकमन by टीम लोकमन
June 12, 2025
in ताज्या घडामोडी
0
माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ व शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी डोणज येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे रास्ता रोको आंदोलन

टीम लोकमन मंगळवेढा |

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आणि दिव्यांग बांधवांना 6000 रुपये पेन्शनसह अन्य 15 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करावा, दिव्यांग बांधवांना 6000 रूपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक बच्चु कडू यांनी गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहेत त्याचा भाग म्हणून राज्यातील सर्व तालुक्यात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. या आदेशानुसार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंगळवेढा येथील डोणज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंगळवेढा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित करण्यात आले व यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या नावे मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील, गणेश चिकमने, समाधान कोरे, शिवा स्वामी, अप्पू मिराकोर, राजकुमार चिकमने, बाबसाहेब बुध्याळकर, पवन मोरे, शिवानंद पुजारी, भोजप्पा केदार, माजी उपसरपंच रमेश केदार, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत केदार, गुरू स्वामी, संदीप आनंदपुरे, गुरुनाथ बिराजदार, सचिन जिगजेनी, हरी भाऊ इंगळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील पत्रकारांशी बोलताना असे म्हणाले की माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या अमरावती येथील मोझरी येथे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगाना 6000 महिना शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीची मजुरांकडून होणारी सर्व कामे, रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाद्वारे करण्यात यावी व अन्य 15 विविध मागण्यासाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व सध्या तरी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होऊन सातबारा कोरा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी व अस्मानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईत बुडला आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या जाहीरनाम्यात संपूर्ण कर्जमाफीची आश्वासन दिलेल्या पक्षाने सत्तेत आल्यानंतर विधानसभेत चकार शब्दही बोलत नाही त्यामुळे बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांची मार्गदर्शनाखाली डोणज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष पुढे बोलताना असे म्हणाले की माजी मंत्री तथा पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी व अन्य 15 मागण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचा सुरू आहे त्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाकडून यापुढे प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन राहील.

Previous Post

मोठी बातमी ! अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन

Next Post

प्रवाशांच्या सेवेसाठी ! ग्रुप बुकिंग केल्यास आता आपल्या गावातून थेट पंढरपूरला एसटी बसने जाता येणार ; आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 5 हजार विशेष बसेस : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group