टीम लोकमन सांगोला |
सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित झाली असून या योजनेमधून होणाऱ्या मोफत उपचारांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन दिशा हॉस्पिटलचे संचालक व सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे, जी राज्यातील सर्व कुटुंबांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा पुरवते. या योजनेत प्रति कुटुंब प्रति वर्षी 5 लाख आरोग्य संरक्षण, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. ही योजना सर्वसमावेशक असून विविध प्रकारच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवांमध्ये मदत करते.
या संदर्भात डॉ. सचिन गवळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासूनच मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सांधारोपण शस्त्रक्रियेसाठी निधी, सर्व मेडिक्लेम कॅशलेस सुविधा असून या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या फॅक्चर, ॲक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर, आर्थोस्कोपी (खांदा, गुडघा निसटणे उपचार) प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया (THR,TKR) स्पाईन सर्जरी, जबड्याची शस्त्रक्रिया, मणक्याचे सर्व आजाराचे निदान व उपचार केले जातात.
सांगोला शहरातील कडलास नाका परिसरात असलेल्या दिशा हॉस्पिटलमध्ये डॉ. सचिन गवळी यांचेसह तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. डॉ. सचिन गवळी यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांना वेदनेच्या प्रवासात मदतीचा हात दिला आहे. हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया करून अपघातातील रुग्णांना जीवदान दिले आहे. दिशा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सचिन गवळी हे अखंडित व अविरतपणे रुग्णसेवा करीत आहेत.
सांगोला शहरातील एक अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हॉस्पिटल म्हणून दिशा हॉस्पिटलची सर्वदूर ख्याती आहे. हॉस्पिटलमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटरसह, महिला व पुरुषांचे स्वतंत्र वॉर्ड, स्पेशल रूम, डीलक्स रूम, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅबचीही सुविधा उपलब्ध आहे. हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित, अनुभवी व विनम्र नर्सिंग स्टाफ कार्यरत आहे.