टीम लोकमन मंगळवेढा |
शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाचव्या पुष्पातून आज सायंकाळी 7.30 वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज वाशीम यांच्या सप्त खांजिरी कीर्तनातून पंकजपाल की प्रबोधनवाणी हा कार्यक्रम होणार आहे.
संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचार सप्त खांजिरीतून ते मांडणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके यांचेहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर दत्तू, मारुती वाकडे, मुरलीधर घुले, रविकिरण कदम, सुहास देशमुख, भारत नागणे, येताळा भगत, राजाराम सूर्यवंशी, अर्जुन नागणे, नामदेव शिंदे, अरुण किल्लेदार, संजय कट्टे, दिलीप घाडगे, संग्राम पवार, दिलीप सावंत , बजरंग ताड, विष्णुपंत जगताप, सतिश भाऊ दत्तू, चेतन शिंदे, संजय नागणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व नागरिक व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी केले आहे.