news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी पोलिसांनी अडवली ; भुसे झाले प्रचंड आक्रमक, पोलिसांना विचारला जाब, पुढे काय झाले?

टीम लोकमन by टीम लोकमन
June 23, 2024
in राजकीय
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी पोलिसांनी अडवली ; भुसे झाले प्रचंड आक्रमक, पोलिसांना विचारला जाब, पुढे काय झाले?

टीम लोकमन मंगळवेढा |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौरा आटोपून त्यांचा ताफा ओझर विमानतळावर जात असताना विमानतळाच्या गेटवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला पोलिसांनी अडवले.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होत आहे. नाशिकच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे घटक असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी बैठकांचे सत्रही सुरु झाले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता किशोर दराडे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठका पार पडल्या.

नेमकं घडलं तरी काय?

नाशिकच्या बैठका आटोपून मुख्यमंत्री एकनाथ हे ओझर विमानतळावर जाण्यासाठी निघाले. यावेळी विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला पोलिसांनी अडवले. पालकमंत्री दादा भुसे हे मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसले असल्याने पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक आणि इतर स्टाफ दादा भुसेंच्या वाहनात होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांची गाडी अडवली होती.

आम्ही आतंकवादी आहोत का?

यानंतर गाडीला विमानतळाच्या गेटमध्ये प्रवेश देत नसल्याने दादा भुसे यांचे स्वीय सहायक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आम्ही काय आतंकवादी आहोत का? असा प्रश्न यावेळी पोलिसांना विचारण्यात आला. काही वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांनी गाडी सोडली. मुख्यमंत्री शिर्डीला रवाना झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. गाडीत स्टाफ असताना गाडीला का अडवले? असे खडेबोल दादा भुसेंनी पोलिसांना सुनावले.

Previous Post

सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; सरोगसीद्वारे माता बनणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Next Post

वर्दीला काळीमा ! सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून विवाहित महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार ; पतीला सोडण्यासाठी आणला दबाव, जीवे मारण्याचीही दिली धमकी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group