news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पवारांना पिपाणीची धास्ती ! लोकसभेतील ‘पिपाणी’ चा आवाज विधानसभा निवडणुकीत बंद करा, निवडणूक आयोगाला शरद पवारांचे पत्र ; लोकसभेला साताऱ्यात पिपाणीमुळे तुतारी वाजलीच नाही

टीम लोकमन by टीम लोकमन
June 25, 2024
in ताज्या घडामोडी
0
शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का ; अतिशय निकटवर्तीय राष्ट्रीय पातळीवरील ‘हि’ दिग्गज महिला नेता सोडणार पवारांची साथ?

टीम लोकमन मंगळवेढा |

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जे चिन्ह दिले होते त्याच्याशी साधर्म्य असलेले चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिले गेले होते. याचा फटका पवारांच्या उमेदवाराला बसला. यामुळे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीत ते चिन्ह वगळावे अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे.

शरद पवारांच्या गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. हे चिन्ह लोकांपर्यंत कमीतकमी काळात पोहोचणार नाही म्हणून पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथे आपल्याला राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह परत मिळावे अशी मागणी केली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. यानंतर लोकसभेला काही मतदारसंघांत निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना देत संभ्रम निर्माण केल्याचा आरोपही पवार गटाने केला होता.

सातारा आणि दिंडोरी मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवाराला फटका बसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला होता. पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला ३७ हजार मते पडली होती. तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा १ लाख १३ हजार मतांनी पराभव केला होता. परंतू, पिपाणी चिन्ह असलेल्या बाबू भरगे यांना तब्बल १ लाख ०३ हजार मते पडली होती. एका मतदारसंघात पराभव तर एका मतदारसंघात विजय मिळूनही मते दुसरीकडे गेल्याने पवार गटाने ही तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतला असून त्यामुळेच हे पत्र पाठविण्यात आले आहे. खुल्या निशाणीमधून पिपाणी हे चिन्ह वगळावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयात जाणार असा इशाराही देण्यात आला आहे.

Previous Post

धक्कादायक ! विद्येच्या माहेरघरातच अल्पवयीन मुलीवर काका आणि चुलत भावाकडून लैंगिक अत्याचार, वडिलांचे देखील क्रूर कर्म ; पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने खळबळ

Next Post

ग्रेट ! निलेश लंके यांनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ ; सुजय विखेंच्या चॅलेंजला कृतीतूनच दिले उत्तर, शरद पवारांच्या पठ्ठ्याचे सर्वत्र कौतुक

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group