news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पालकांनी विद्यार्थ्यांकडून अनावश्यक अपेक्षा धरु नयेत : डॉ. नसीमा पठाण

मंगळवेढा महोत्सवात विद्यार्थी पालक शिक्षक बदलत्या काळानुसार शैक्षणिक संदर्भ या विषयावर व्याख्यान

टीम लोकमन by टीम लोकमन
May 4, 2024
in शैक्षणिक
0
पालकांनी विद्यार्थ्यांकडून अनावश्यक अपेक्षा धरु नयेत : डॉ. नसीमा पठाण

टीम लोकमन मंगळवेढा |

आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता पाहूनच पालकांनी विद्यार्थ्यांना कसे घडवावे याचा विचार करावा पालकांनी विद्यार्थ्यांकडून अनावश्यक अपेक्षा धरू नयेत असे प्रतिपादन डॉ. नसीमा पठाण यांनी केले.

मंगळवेढा महोत्सवांतर्गत शुक्रवारी विद्यार्थी पालक शिक्षक बदलत्या काळानुसार शैक्षणिक संदर्भ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष कदम, प्रशासन प्रमुख प्रा. डॉ. मीनाताई कदम, प्राचार्य रवींद्र काशीद, सुभाष बाबर, अजित शिंदे, कल्याण भोसले, रमेश पवार, उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पठाण यांनी सांगितले की, शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असताना तो नेहमी उपयुक्त असणारा घटक आहे. घाई घाईत कधीच विद्यार्थी घडत नसतो. शाळेत शिकणारा विद्यार्थी समाजाच्या शाळेत देखील आयुष्यभर नवनवीन शिक्षण घेत असतो. यामध्ये सुद्धा त्यांना शिकवणारे शिक्षक मोलाची भूमिका बजावत असतात. सध्या विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील त्याच्या भावना समजून घेणे आवश्यक झाले आहे. मुलांना काय हवं आहे यापेक्षा तो कशामध्ये व्यवस्थित आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना त्यांना मनासारखे शिक्षण मिळाल्यानंतर ते त्यात जीव ओतून शिक्षण घेतात. समाजामध्ये गरीब पालक सध्या विवंचनेत आहेत. जास्त फि आकारणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते असा त्यांचा ग्रह असून त्या ठिकाणी त्याला शिक्षण मिळेल या अपेक्षा ते ठेवत आहेत. मात्र या देशाच्या उभारणीत मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकणाऱ्या अनेक लोकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटेल असे काम शिक्षकांनी करून ते विद्यार्थी भविष्यात त्यांच्यापेक्षा मोठ्या पदावर गेले पाहिजेत यासाठी शिक्षकांचा दरारा राहिला पाहिजे असेही डॉ. पठाण आपल्या भाषणात शेवटी म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण दत्तू यांनी केले तर जयश्री माईनकर आभार मानले.

Previous Post

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला अधिक वाव ; उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे

Next Post

मोठा निर्णय ! जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे महाविकास आघाडी सोबत ; मंगळवेढ्यात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचे बळ वाढले

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group