टीम लोकमन पंढरपूर |
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात ६ सप्टेंबर २०२५ रोजी पालक मेळावा उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या उपक्रमामुळे पालक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र येऊन संवाद साधण्याची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची अनमोल संधी मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. ज्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस. डी. कटेकर, पालक प्रतिनिधी सौ. केसकर आणि पालक मेळावा समन्वयक प्रा. अमित भादुले यांच्या हस्ते पार पडले.
यानंतर विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी विभागाची सविस्तर माहिती देत विविध उपक्रम, प्रगती आणि भविष्यातील योजनांची मांडणी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा दिली. पालकांनीही विभागाच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक केले.
या मेळाव्यातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी, प्लेसमेंट मिळवलेले विद्यार्थी तसेच जपानी भाषेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला व पालकांसाठी अभिमानाचा क्षण निर्माण झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गुरुराज इनामदार यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले.
या पालक मेळाव्यामुळे पालक, प्राध्यापक व विद्यार्थी यांचे नाते अधिक दृढ झाले असून विभागाचा अभिमान वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सवही साजरा झाला. हा दिवस अभिमान, कृतज्ञता आणि प्रेरणेने परिपूर्ण ठरला. पालक मेळावा यशस्वी होण्यासाठी विभागातील प्रा. सर्जेराव महारनवर, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचा सहभाग दिला.