टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढ्यातील सीबीएसई पॅटर्न राबवणारी सुप्रसिद्ध व एकमेव प्रशाला म्हणजे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी एकमेव प्रशाला म्हणून सर्वदूर परिचित असणारी तालुक्यातील इंग्रजी माध्यमाची शाळा. या शाळेने सर्वच क्षेत्रामध्ये स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक, तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांना अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचविण्याकरीता प्रयत्न करणारी ही प्रशाला. समाजाला चांगला नागरिक देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे शिक्षकही प्रशालेस लाभले आहेत. यावर्षी प्रशाला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने देखील सन्मानित झाली आहे.
दरवर्षी दहावीचा लागणारा शंभर टक्के निकाल, तसेच मंथन,ओलंपियाड व स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सतत यश मिळत आहे. क्रिकेट सारख्या खेळाचे प्रशिक्षण प्रशालेमध्ये दिले जात आहे. त्याचप्रमाणे संगीतामध्ये देखील या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे. गणिताच्या विविध क्रियाकलापामध्ये विद्यार्थ्यांनी परफेक्ट व्हावे यासाठी अबॅकसचे क्लासेस प्रशालेमध्ये सुरु केले आहेत. त्याचप्रमाणे प्रशालेमध्ये प्री प्राइमरी गटासाठी ग्रँड पेरेंट्स डे, रेड डे, ग्रीन डे, हेल्पर्स डे, नर्सरीसाठी वंडरलैंड स्मार्ट क्लास कृतीयुक्त शिक्षण यासारखे उपक्रम आयोजित केले जातात.
प्रशालेमध्ये प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद तर आहेच पण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व सुविधायुक्त शिक्षण दिले जाते. सुसज्ज अशा वर्ग खोल्या, ग्रंथालय व संगणक कक्ष भव्य असे विस्तीर्ण क्रीडांगण आहे. शैक्षणिक सहलीबरोबर औद्योगिक, भौगोलिक प्रकल्पांना भेटी दिल्या जातात. ग्रामीण भागातून शाळेमध्ये येण्या-जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय बसची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी यावर्षीच नव्याने उन्हाळी शिबिरामध्ये क्रिकेट, संगीत, रांगोळी, चित्रकला असे 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये छंद वर्गांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उस्फूर्त असा मोठा प्रतिसाद मिळाला. हे सर्वांसाठी खुले होते.
अशा या गुणवैशिष्ट्यांबरोबरच मंगळवेढ्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे व राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर नंदकुमार शिंदे यांच्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नातून शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शैक्षणिक दर्जाचा आलेख देखील उंचावतच आहे. शैक्षणिक गुणवत्ते सोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष असते. त्यामुळेच या प्रशालेतील विद्यार्थी सर्वार्थाने परिपूर्ण होत आहेत. या शाळेतील प्रत्येक शिक्षक आपल्या कार्याशी आणि कर्तव्याशी एकनिष्ठ राहून ज्ञानार्जनाचे कार्य अविरतपणे करत आहेत. त्यामुळेच या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा आहे. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार सर यांचे शिस्तबद्ध प्रशासन, योग्य नियोजन आणि शिक्षण क्षेत्राबद्दल असलेली तळमळ, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परता यामुळे या प्रशालेचे नाव संपूर्ण मंगळवेढा तालुक्यासह, सोलापूर जिल्हा आणि शेजारच्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा विद्यार्थी आणि पालकांच्या मनामनात कोरले जात आहे.
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अकरावी व बारावीचे नवीन वर्ग लवकरच सुरू करण्याचे नियोजन असून अकॅडमी सुरू करून इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवरच एक उत्तम शैक्षणिक पर्याय देण्याचा विचार आहे. त्यासोबतच इयत्ता आठवी पासून फाउंडेशन सुरू करून कोटाच्या धर्तीवर उत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून नीट व जेईई सोबतच एमपीएससी व यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांना सहज सामोरे जाता येईल. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत विद्यार्थी निवासी पद्धतीने पूर्णवेळ शाळेमध्येच राहून सर्व प्रकारचे खेळ, योगा, मेडिटेशन, अभ्यास व वेगवेगळे छंद जोपासू शकतील आणि शनिवार व रविवार दोन दिवस ते अभ्यासाशिवाय कुटुंबासोबत असतील. अशा प्रकारची अर्धनिवासी शाळा सुरू करण्याचे देखील नियोजन आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांवर कौटुंबिक व सामाजिक संस्कार अबाधित राहतील त्यासोबतच कुटुंबापासून दूर राहून स्वावलंबनाचे धडे सुद्धा त्यांना गिरवता येतील. या माध्यमातून मोबाईलच्या वेढापासूनही विद्यार्थ्यांना परावृत्त करता येईल.
डॉ. पुष्पांजली नंदकुमार शिंदे, संस्थाप्रमुख
उपक्रमशील व तंत्रज्ञानाचा योग्य समतोल साधून ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमचे ज्ञानदान करणारी मंगळवेढ्यातील एकमेव शाळा असून मुलांना परिपूर्ण बनवण्यासाठी अनुभवी व कुशल शिक्षकवृंद कार्यरत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 व त्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने NCRTE चा अभ्यासक्रम दृष्टीपथात ठेवून मुलांना स्पर्धेच्या युगात तयार करण्यासाठी शाळा 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाली आहे.
सुधीर पवार, प्राचार्य
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देतो. आनंददायी व रचनावादी अध्यापन केले जाते. ई लर्निंग सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, शैक्षणिक सहल, औद्योगिक व भौगोलिक प्रकल्पांना भेट, सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचा विकास व स्मार्ट बोर्ड द्वारे टिचिंगची सोय उपलब्ध असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
रेणुका सागर पाटील, शिक्षिका
शाळा हे मुलांचे समृद्ध आयुष्य घडविणारे एक मूलभूत केंद्र आहे. उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मिळणारे शिक्षण, सोयीसुविधा व शाळेत राबविले जाणारे उपक्रम उत्तम प्रकारचे आहेत. माझ्या मुलींना या शाळेत मिळणारे शिक्षण हे अतिशय दर्जेदार आहे. मोठ्या शहरांमध्ये व मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाच्या तुलनेचे शिक्षण मंगळवेढा सारख्या ग्रामीण भागात मिळत आहे त्याबद्दल मी खूप समाधानी आहे.
राजन सर्जेराव पाटील, पालक, ब्रह्मपुरी
आलिया व अफान ही माझी दोन मुले गेल्या दोन वर्षापासून उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत आहेत. या शाळेत प्रवेश घेतल्यापासून माझ्या मुलांमध्ये खूप चांगला बदल मला जाणवत आहे. या शाळेत वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, खेळांचे उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता व शारीरिक फिटनेस मध्ये वाढ होते. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात व्यासपीठ ही उपलब्ध केले जाते. त्यामुळे सर्वगुणसंपन्न अशी मुले तयार होतात. या सर्व गोष्टीचे श्रेय मी या शाळेच्या प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी वर्ग या सर्वांना देते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक विकास होत असलेला माझ्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे मी या शाळेबद्दल पूर्णपणे समाधानी आहे.
तसनीम असिफ मुल्ला, पालक, मंगळवेढा










