news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

ओव्हरटेकिंगचा नाद नडला ! 44 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

टीम लोकमन by टीम लोकमन
March 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओव्हरटेकिंगचा नाद नडला ! 44 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

टीम लोकमन पुणे |

पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ झालेल्या एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला एका सुसाट कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की एसटी बस महामार्गाच्या कडेला जाऊन थेट उलटली. मात्र या भीषण अपघातात बसमधील सर्व प्रवासी बचावले असून 44 प्रवासी मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले.

ओव्हरटेकिंगचा थरार आणि एसटीचा चक्काचूर…

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आपल्या मार्गाने जात असताना एका भरधाव कंटेनरने चालकाच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंटेनरची एसटीला इतकी जोरात धडक बसली की एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. बसच्या पुढच्या आणि मागच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

स्थानिक देवदूतासारखे मदतीसाठी धावले…

अपघात होताच प्रवासी घाबरून मोठ्याने किंचाळले. बस पलटी झाल्याचे पाहताच जवळच असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. बसच्या खिडक्यांमधून आणि दरवाजातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ 2 ते 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या भीषण अपघातात सुदैवाने 44 प्रवाशांचा जीव अगदी थोडक्यात वाचला.

Previous Post

धक्कादायक ! शेतात कडबा गोळा करत असताना सर्पदंश होऊन 55 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू ; सुनिता यांचा मदतीसाठी आरडाओरडा, पण….

Next Post

नारीशक्तीचा सन्मान ! मंगळवेढ्यात लोकमंगल बँकेच्या वतीने नारीशक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात ; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा झाला गौरव

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group