news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

संतापजनक ! खासगी ट्युशन क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ ; शिक्षकाला बेदम चोप देत नागरिकांनी काढली धिंड, धक्कादायक प्रकाराने पालक चिंतेत

टीम लोकमन by टीम लोकमन
August 29, 2024
in क्राईम
0
संतापजनक ! खासगी ट्युशन क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ ; शिक्षकाला बेदम चोप देत नागरिकांनी काढली धिंड, धक्कादायक प्रकाराने पालक चिंतेत

टीम लोकमन मंगळवेढा |

खासगी ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप देत नागरिकांनी धिंड काढल्याची घटना बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा परिसरात घडली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मनवेल पाड्याच्या सह्याद्री नगरमध्ये आरोपी शिक्षक प्रमोद मौर्या हा इशांत नावाने खासगी ट्युशन क्लास चालवत आहे. यामध्ये त्याने ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मागील आठवड्यात लैंगिक छळ केल्याने ती घाबरून २ दिवस ट्युशनला गेली नाही. तिला घरच्यांनी ट्युशनला का जात नाही हे विचारल्यावर तिने घरच्यांना घडलेली घटना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

यानंतर बुधवारी सकाळी मुलीचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक ट्युशनमध्ये गेले व आरोपी शिक्षकाला मारहाण करून भर रस्त्यावरून त्याची धिंड काढली. या झालेल्या मारहाणीत आरोपी शिक्षक हा रक्तबंबाळ झाला होता. या शिक्षकाने ३ ते ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

ज्या मुलींचा या आरोपी शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे त्या मुली घाबरतात. याची पोलिसांनी चौकशी करून आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आरती पडवळ या स्थानिक महिलेने केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. मुलांना शिक्षकांकडे शिकविण्यासाठी विश्वासने पाठवतो परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत आहे. हा नागरिकांच्या संतपाचा उद्रेक होता. त्याला बेदम मारहाण करत धिंड काढल्याचे मनिष राऊत यांनी सांगितले.

Previous Post

मोठी बातमी ! भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला ; संगीता ठोंबरे यांच्यासह कारचालक जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

Next Post

श्री संत सेना महाराज आणि संत परंपरा….

Next Post
श्री संत सेना महाराज आणि संत परंपरा….

श्री संत सेना महाराज आणि संत परंपरा....

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group