टीम लोकमन मंगळवेढा |
अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना बुलढाण्यात घडली आहे. बुलढाण्यात छोटेसे किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे जात मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरने सिगारेट आणि चहाची मागणी केली. परंतु आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असे उत्तर महिलेने दिल्याने डॉक्टरला राग अनावर झाला.
याच रागातून डॉक्टरने महिलेला मारहाण केली आहे. सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे या मस्तवाल डॉक्टरने महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत डॉक्टरने केलेल्या मारहाणीत सदर महिला गंभीर जखमी झाली आहे.
बुलढाण्यातील जळगाव जमोद तालुक्यात राहणारी एक महिला किराणा मालाचे एक छोटेसे दुकान चालवते. महिलेचे दुकान घराला लागूनच आहे. मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरने महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. महिलेने दार उघडले. त्यावेळी डॉक्टरने महिलेकडे एक सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र महिलेने डॉक्टरला स्पष्ट नकार दिला. आता फार उशीर झाला आहे तुम्ही उद्या या. असे महिलेने स्पष्टपणे सांगितले. पण महिलेने दिलेल्या नकाराने डॉक्टरला राग अनावर झाला आणि त्याने महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचे कपडे फाडले आणि तिला निर्वस्त्र देखील केले.
गोविंद वानखेडे असे महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण करणाऱ्या नराधम डॉक्टरचे नाव आहे. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातली जळगाव जामोद येथे घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या महिलेला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
महिलेच्या अंगावरील संपूर्ण वस्त्र फाडून या महिलेला विवस्त्र करण्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद शहरात घडली आहे. डॉ. गोविंद वानखेडे याचे जळगाव जामोद शहरात वानखेडे हॉस्पिटल नावाने प्रख्यात हॉस्पिटल आहे.
पोलिसांनी नराधम डॉ. गोविंद वानखेडेवर कलम 376/2024, 74, 75, 76, 296, 324(1), 333, 352, 351(2), 351(3), 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. पण या घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून फरार डॉक्टरचा शोध सुरू आहे.









