टीम लोकमन सोलापूर |
लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिव व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर आणि सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकमंगल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस यांनी दिली.
लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेचा २६ वा वर्धापन दिन २८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २६ व २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, सोलापूर येथे दोन दिवसांची शिव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी संदीप खरे यांचे संदीप, वैभव आणि कविता या विषयावर तसेच वैभव जोशी यांचे कविता सादरीकरण होणार आहे. शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी डॉ. शिवरत्न शेटे यांचे चला शिवसंस्कार जपूया या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयात शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. बँकेचे सभासद ठेवीदार खातेदार कर्जदार व हितचिंतकांनी या सर्व कार्यक्रमांसाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन राजेशसिंह बायस यांनी केले आहे. यावेळी संचालक अशोक मादगुंडी, प्रल्हाद कांबळे, दिपाली कोठारी आदी उपस्थित होते.









