टीम लोकमन मंगळवेढा |
शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या पुष्पातून आज सायंकाळी 7.30 वाजता युवा शाहिर अविष्कार देशिंगे कवठेमहांकाळ जि. सांगली हे पोवाडा व स्फूर्तीगीतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा सादर करणार आहेत.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सिमाताई परिचारक यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. प्रणिताताई भालके असणार आहेत. यावेळी सुनंदा आवताडे, धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, माजी नगरसेविका श्रीमती भगिरथी नागणे, यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन निलाताई आटकळे, आशाताई नागणे, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिती शिर्के, माजी नगरसेविका सब्जपरी मकानदार, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा अरुणाताई माळी, अरुणाताई दत्तू, इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम, सुनीता सावंत,
सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. आसावरी घोडके, संगिता कट्टे, रतनताई पडवळे, माजी नगराध्यक्ष राखीताई कोंडूभैरी, माजी नगरसेविका राजश्री टाकणे, समृद्धी महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुप्रिया जगताप, श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्ष व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पाजंली शिंदे, विशाखा खवतोडे, माजी नगरसेविका निर्मलाताई माने, ऍड कुमुदिनी घुले, माजी नगरसेविका अनिता नागणे, उषादेवी सारडा, सिमाताई बुरजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास मंगळवेढा तालुका व परिसरातील नागरिक व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी केले आहे.