टीम लोकमन मंगळवेढा |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुका कार्याध्यक्ष व स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोणेवाडी येथे कार्यरत असलेले शिवशाही परिवाराचे संस्थापक माणिक बबन गुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी गोणेवाडी येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते खासदार शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन माणिक घुगे यांनी समाजकारण आणि राजकारणाची सुरुवात केली. त्यांनी आपल्या समाजकार्याचे माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात मोठे काम उभा केले आहे. संपूर्ण तालुकाभर युवकांचे मोठे जाळे त्यांनी विणले आहे. आपल्या सामाजिक कार्याचे माध्यमातून त्यांनी तालुक्यातील विविध वंचित घटकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रश्नांवर झालेल्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. विविध राजकीय पदांवर त्यांनी काम केले असून सध्या ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मंगळवेढा तालुका कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
माणिक गुंगे यांच्या पत्नीदेखील विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. त्या स्तंभलेखिका असून स्थानिक दैनिकांमधून त्यांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचत आहे. त्यांनी लिहिलेल्या आत्मभान या पुस्तकाचे प्रकाशनही आजच पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव, प्रा. डॉ. तानाजी देशमुख यांचेसह विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाले. माणिक गुंगे यांच्या यशस्वी सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये त्यांच्या पत्नी रेश्मा गुंगे यांचा सिंहाचा वाटा आहे.
आज सायंकाळी साडेपाच वाजता गोणेवाडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज सुधारक ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शिवशाही परिवाराचे अध्यक्ष माणिक गुंगे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सहसचिव शिवाजी गावकरे, खजिनदार विजय जाधव, सदस्य बालाजी गुंगे, समाधान गुंगे व स्वामी विवेकानंद विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि गुंगे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.







