टीम लोकमन |
गुढीपाडव्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली असून मुंबई -पुणे महामार्गावरील खोपोलीनजीक एक गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृत तरुण हे खालापूरहून मुंबईकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याहून मुंबईकडे जाताना कार पलटी झाली
उपलब्ध माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाताना एक कार वेगाने आली आणि नंतर ती पलटी झाली. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहेत. ओंकार बोरसे (वय 22, नाशिक), लया भट्ट (वय 23, नागपूर) आणि श्रेयश शर्मा (वय 22, जयपूर) अशी त्यांची नावे आहेत. या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याची माहिती आहे.
या अपघातात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू…
या कारमध्ये 4 विद्यार्थी होते. त्यापैकी एक बचावला असून इतर तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक विद्यार्थी हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खालापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत तरुणांचे मृतदेह कामोठे MGM येथे ठेवण्यात आले होते. मृतकांमध्ये मुंबईतील आयआयटी पवईचे विद्यार्थीही समाविष्ट आहेत. या अपघातानंतर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






