news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
November 6, 2025
in सामाजिक
0
शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

टीम लोकमन मंगळवेढा |

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने घेण्यात आलेल्या स्पीच कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अभिजीत बने यांनी दिली.

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने गेल्या काही दिवसांपूर्वी उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा येथे इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन घेण्यात आल्या होत्या. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा येथे संपन्न होणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या या स्पीच कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर जिल्ह्यातील नामवंत उद्योजक व एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांचे शुभहस्ते व पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंजिनिअर सुशील आवताडे, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पीच कॉम्पिटिशनचे प्रायोजक मंगळवेढा येथील अबोली बने यांचे लाईफस्टाईल ब्युटी पार्लर असून दिलीप घाडगे यांचे श्री बालाजी ज्वेलर्स मंगळवेढा व सतीश मर्दा यांचे बालाजी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स मंगळवेढा हे सहप्रयोजक आहेत. रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने या स्पीच कॉम्पिटिशनचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून क्लबचे ट्रेझरर उमेश मर्दा यांनी अतिशय यशस्वी व उत्तमरीत्या जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी कुलदीप रजपूत यांनी केले आहे.

Previous Post

तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Next Post

महाराष्ट्र पोलिसांचं नवं नेतृत्व ! वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते होणार राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group