news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

आता दातांवरही होणार मोफत उपचार ! दंत वैद्यकीय उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ? राज्य सरकारचा मोठा निर्णय ; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

टीम लोकमन by टीम लोकमन
July 2, 2024
in आरोग्य
0
आता दातांवरही होणार मोफत उपचार ! दंत वैद्यकीय उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ? राज्य सरकारचा मोठा निर्णय ; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

 

टीम लोकमन मंगळवेढा |

अनेक आजारांसाठी सरकारी योजना लागू होतात. तसेच मेडिक्लेममुळे देखील अनेक आजारांवरील खर्च कमी होतो. परंतु दंत चिकित्सेसाठी आत्तापर्यंत कोणतीही वैद्यकीय योजना लागू होत नव्हती, हे आपणास माहिती असेलच. पण आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेने सर्वांच्याच चेहऱ्यावर स्माईल आली आहे.

राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला मोठे आश्वासन दिले आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचा समावेश होणार आहे. त्यामुळे दंतविकाराने त्रस्त असणाऱ्या सामान्य रुग्णांना वेदनेच्या प्रवासात मदतीचा हात मिळणार आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या चेहऱ्यावर आपसूकच स्माईल आली आहे. मुंबई पुणे आणि इतर शहरातील खासगी रुग्णालयातही योजना लागू करण्यात येणार आहे. यासाठी डेलिगेशन रुग्णालयांना भेट देणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. राज्यातील जनतेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.

हा असमतोल कसा भरून काढणार ?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपैकी केवळ 1.5 लाख रुपये विमा कंपनी देणार असून उर्वरित 3.5 लाख रुपयांची हमी राज्य सरकार घेणार असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली. यापूर्वी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृ्त्तीची हमी राज्य सरकारने घेतली होती. ही हमी पूर्ण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याने अनेक शिक्षण संस्थांना आणि विद्यार्थ्यांना 4-4 वर्ष शिष्यवृत्तीसाठी थांबावे लागते. अशातच आता हॉस्पिटलची बिले जर सरकारने वेळेवर दिली नाहीत व त्यामुळे सामान्य नागरीकांना मनस्ताप सुरु झाला तर या प्रकाराला कोण जबाबदार असणार ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करताना अडचणी समोर येतात. हि योजना पूर्वी 900 रुग्णालयात होती. 350 पैकी 137 तालुक्यात योजना अद्यापही लागू नाही, हा असमतोल कसा भरून काढणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बोगस पेशंटच्या तक्रारी येतात त्यावर काही ठोस कारवाई होणार का? बोगस रुग्णालयांना ब्लॅकलिस्ट करतो तरी ते सुरू राहतात, 137 तालुक्यात ही योजना कशी राबवणार? चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरांवर काय कारवाई करणार? ही योजना फसवी होऊ शकते, पूर्ण पैसे (५लाख) सरकार देणार का? डेंटल उपचारांचा समावेश घेणार का? असा प्रश्न सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला होता. याला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिले.

रुग्णांच्या उपचारांची संख्या वाढवून 1356 केली. या योजने अंतर्गत सध्या 997 रुग्णालये अंगीकृत. (801 खाजगी आणि 196 शासकीय) डेंटल उपचार या यादीत जोडला जाईल. योजना 137 तालुक्यात पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे तानाजी सावंत म्हणाले. 131 गंभीर आजार आहेत ज्याला सरकारी रुग्णालयातच उपचार दिले जातात. मुंबई पुण्यातील मोठी रुग्णालये ही योजना लागू करत नाहीत. शहरानुसार उपचाराचे दर वेगळे असले पाहिजेत, असे सत्यजित तांबे म्हणाले.

एकत्रित योजनेतील 1 हजार रुग्णालयांचा समावेश

योजनेत बसत असेल तर त्यांनाही योजना लागू करायला लावू पण बळजबरी करू शकत नाही. खात्याचे डेलिगेशन या शहरांतील रुग्णालयात भेट देईल, गरजूंना याचा लाभ घेता येईल. 131 उपचार प्रायव्हेट आणि शासकीय रुग्णालयात दिले जातील जुलै अखेरपर्यंत सगळ्या रुग्णालयांना या योजनेत समाविष्ट केले जाईल असे उत्तर तानाजी सावंत यांनी दिले. विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये एकूण 1000 इतक्या मर्यादेपर्यंत रुग्णालये अंगीकृत करण्याची मर्यादा होती. या योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले असून याबाबत शासन निर्णयास अनुसरुन राज्यातील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1900 इतकी होणार आहे. यात विद्यमान एकत्रित योजनेतील 1 हजार रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

सात जिल्ह्यांमध्ये 140 खासगी रुग्णालये

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील गावांसाठी 150 रुग्णालयांचाही समावेश आहे. यापैकी, कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये 140 खासगी रुग्णालये आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटकातील (बिदर, कलबुर्गी, कारवार आणि बेळगावी) 4 जिल्ह्यांधील 10 खाजगी रुग्णालये अंगीकृत करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रातील 200 रुग्णालये अंगीकृत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महानगरपालिका आणि नगरपरिषद रुग्णालये यांच्या नियंत्रणाखालील सुमारे 450 रुग्णालयांचा समावेश असेल. तसेच महाराष्ट्रातील मागास भागात स्थापन करण्यात येणारी इच्छुक आणि पात्र नवीन 100 रुग्णालयांचा समावेश असेल असेही सांगण्यात आले.

Previous Post

जत कृषी कार्यालयावर भाजपचा विराट मोर्चा, अधिकाऱ्यांना घेराव ; शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही : तमनगौडा रवीपाटील

Next Post

काळाचा घाला ! पुणे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात ; पाच जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Next Post
काळाचा घाला ! पुणे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात ; पाच जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

काळाचा घाला ! पुणे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात ; पाच जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group