टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर ॲक्शन मोडवर आल्या असून त्यांनी विविध कामांचा आढावा घेण्यासोबतच मतदारांच्या भेटीसाठीही सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून उद्या मंगळवार दिनांक 11 जून पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कृतज्ञता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कृतज्ञता मेळाव्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचे सोबतच काँग्रेसचे विविध पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
मंगळवार दिनांक 11 जून रोजी दुपारी बारा वाजता टीनवाला फंक्शन हॉल अक्कलकोट येथे कृतज्ञता मेळावा होणार आहे. बुधवार दिनांक 12 जून रोजी दुपारी बारा वाजता श्रीराम मंगल कार्यालय मोहोळ येथे हा कृतज्ञता मेळावा संपन्न होणार आहे. गुरुवार दिनांक 13 जून रोजी दुपारी बारा वाजता दाते मंगल कार्यालय पंढरपूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 14 जून रोजी दुपारी बारा वाजता अप्पाश्री लॉन्स मंगळवेढा येथे कृतज्ञता मेळावा संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक 15 जून रोजी दुपारी बारा वाजता दक्षिण सोलापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी होणाऱ्या या कृतज्ञता मेळाव्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांनी केले आहे.








