टीम लोकमन मंगळवेढा |
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन मराठी विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून विद्यालयाचे 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये चमकले आहेत. अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे यांनी दिली.
त्यामध्ये जुनेद दगडू फुलारी 250 गुण जिल्ह्यात 51 वा, राजनंदिनी सत्यवान शिंदे 242 गुण जिल्ह्यात 81 वी, श्रवणी सतीश भगरे 238 गुण जिल्ह्यात 103 वी, करण सचिन गायकवाड 236 गुण जिल्ह्यात 116 वा, विराज पांडुरंग पडवळे 236 गुण जिल्ह्यात 118 वा, संस्कार समाधान साखरे 236 गुण जिल्ह्यात 124 वा, आर्यन नितीन गोवे 232 गुण जिल्ह्यात 152 वा, मनवा निलेश खांडेकर 226 गुण जिल्ह्यात 182 वा, रविराज रेवणसिद्ध मोटे 224 गुण जिल्ह्यात 198 वा, पियुष पवन बजाज 220 गुण जिल्ह्यात 188 वा आला आहे.
या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक संदीप माळी व गौरी कानडे-कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि शालेय वस्तू भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे जनसेवा शिक्षण व समाजसेवा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आर. एन. कुलकर्णी, उपाध्यक्षा निर्मलाताई पटवर्धन, सचिव आप्पासाहेब महालकरी, सर्व संचालक, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुरुनिंग बंडगर यांनी अभिनंदन केले.
यावेळी शिवाजी कोंडूभैरी, सुवर्णा कुलकर्णी, सिद्धेश्वर पवार, प्रकाश पाटील, उज्वला घोडके, सचिन घोडके, विजयकुमार मेटकरी, रविराज माळी, अर्चना यादव, विद्या हुगार, सुजाता स्वामी, ज्योती कलुबर्मे, लंगडे मॅडम व गोविंद शिंदे उपस्थित होते. नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.