news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

राष्ट्रवादी पुन्हा ! सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे ‘हे’ माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पक्षप्रवेश करून शरद पवार पुन्हा पुनर्वसन करणार ?

टीम लोकमन by टीम लोकमन
September 24, 2024
in राजकीय
0
राष्ट्रवादी पुन्हा ! सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे ‘हे’ माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पक्षप्रवेश करून शरद पवार पुन्हा पुनर्वसन करणार ?

टीम लोकमन मंगळवेढा |

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले मोहोळ चे माजी आमदार रमेश कदम यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असून मुंबईमधील वाय बी चव्हाण सेंटर येथे उभय नेत्यांमध्ये बैठक संपन्न झाली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांत जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. महाविकास आघाडीत मोहोळ विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्यानेच मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या रमेश कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. सध्या मोहोळ विधानसभेचे प्रतिनिधित्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने करीत आहेत.

कोण आहेत रमेश कदम?

रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणात त्यांना तुरुंगवास भोगाव लागला होता. वर्षभरापूर्वीच कदम कारागृहातून जामिनावर बाहेर आले आहेत. 2019 ची मोहोळ विधानसभा निवडणूक त्यांनी तुरूंगातून लढवली होती. यशवंत मानेंकडून त्यांचा पराभव झाला. तरीही मोहोळ तालुक्यातील जनतेने त्यांना २५ हजारांच्या जवळपास मते दिली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीमध्ये मोहोळची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असल्यानेच रमेश कदम यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शरद पवारांनी रमेश कदम यांना काय सांगितले?

मोहोळ तालुक्यातील काम, गेली वर्षभर जनतेसाठी राबविलेले विविध उपक्रम, आमदार असताना केलेली विकासकामे आदी मुद्द्यांवर कदम यांनी शरद पवार यांना माहिती दिली. जागा वाटपासंबंधी अंतिम चर्चा झाल्यानंतर आणि पक्षातील नेत्यांशी बोलून येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी सांगितले असल्याचे समजते.

Previous Post

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘इंजिनियर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा ; प्राचार्य तानाजी बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता पंढरपुरात टोकन दर्शनाची होणार सोय, 6 हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप ; 130 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी : आमदार समाधान आवताडे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group