टीम लोकमन पंढरपूर |
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर मध्ये दिनांक 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि उद्योग मंत्रालयाने 10 ते 16 जानेवारी हा संपूर्ण आठवडा राष्ट्रीय स्टार्टअप सप्ताह म्हणून चिन्हांकित केला आहे. स्टार्टअप समुदायाच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतात राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो. स्टार्टअप व्यवसाय मालकांना नवकल्पना, नवनिर्मीती प्रकल्प आणि उदयोजकतेचा विकास, अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाबद्दलची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिली.

सिंहगड इंक्युबॅशन सेंटर मधील स्टार्टअप व्यवसाय मालकांना समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याचा हेतू या राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेमध्ये 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अतुल आराध्ये, धनंजय गिराम, रमेश येवले, किशोर जाधव, अनिता शिंदे, मिलिंद तोंडसे तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








