news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?

टीम लोकमन by टीम लोकमन
June 10, 2024
in ताज्या घडामोडी
0
मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?

टीम लोकमन मंगळवेढा |

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज सायंकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी खातेवाटपही केले. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडील जुनीच खाती कायम ठेवण्यात आली आहेत.

तर काही नव्या चेहऱ्यांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात अमित शाह गृहमंत्रालयाचा कारभार पाहतील. तर राजनाथ सिंह (संरक्षण), निर्मला सीतारामण (अर्थ), एस. जयशंकर (परराष्ट्र) आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. तर नव्यानेच मंत्रिमंडळात समाविष्ट केलेल्या भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आरोग्य मंत्रालयाचा कारभार दिला आहे. तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषीमंत्रिपद देण्यात आले आहे.

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची टीका होत आहे. ४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली आहेत. नितीन गडकरी (भाजपा) आणि पीयुष गोयल (भाजपा) या दोन नेत्यांचाच कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर चार नेत्यांना राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. यापैकी शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. रक्षा खडसे (भाजपा), मुरलीधर मोहोळ (भाजपा), प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट), रामदास आठवले (आरपीआय) या महाराष्ट्रातील चार नेत्यांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.

कॅबिनेट मंत्री

१. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
२. पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

१. प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री

राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती

१. रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
२. रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
३. मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

कुणाला कुठले मंत्रिपद? (कॅबिनेट)

1. राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
2. अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
3. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
4. जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
5. शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
6. निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
7. डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
8. मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
9. एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
10. पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
11. धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
12. जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
13. राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
14. सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
15. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
16. के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
17. प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
18. जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
19. गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
20. अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
21. ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
22. भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
23. गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
24. अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
25. किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
26. हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
27. मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
28. जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
29. चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
30. सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

Previous Post

नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचेवतीने उद्यापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळाव्यांचे आयोजन

Next Post

स्व. महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान सोहळा ; आमदार समाधान आवताडे, इंद्रजीत देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group