माडग्याळ : नेताजी खरात
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील हे जत पूर्व भागात दौऱ्यावर असताना डॉ. सार्थक हिट्टी यांच्या माडग्याळ येथील निवासस्थानी भेट दिली.
या भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या. यावेळी त्यांचे शाल, हार ,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व होत असलेल्या लोकसभा निवडणूक संबंधी चर्चा करण्यात आली, तालुक्याची परिस्थिती जाणून घेतली; व जत तालुका पूर्व भागातील लोकसभेची व येणाऱ्या विधानसभेचे प्रचाराची जबाबदारी डॉ. सार्थक हिट्टी यांच्याकडे सोपवण्यात आली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत खा.संजयकाका पाटील यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन विजय करू असे आश्वासन डॉ. सार्थक हिट्टी यांनी दिले.
यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्वीकृत संचालक सरदार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील पवार, महायुती घटक पक्षाचे जत तालुकाप्रमुख संजय कांबळे, जत तालुका भाजप माजी अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व इतर मान्यवर उपस्थित होत.










