news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

रविवारी मंगळवेढ्यात रंगणार ‘मनसे केसरी 2024’ कुस्ती स्पर्धा ; पाच लाखांचे बक्षीस, राष्ट्रीय मल्लांची उपस्थिती, मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे संयोजन

टीम लोकमन by टीम लोकमन
September 16, 2024
in क्रीडा
0
रविवारी मंगळवेढ्यात रंगणार ‘मनसे केसरी 2024’ कुस्ती स्पर्धा ; पाच लाखांचे बक्षीस, राष्ट्रीय मल्लांची उपस्थिती, मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे संयोजन

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांचेवतीने मनसे केसरी 2024 या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कुस्त्यांचा आखाडा रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावर संपन्न होणार आहे. या आखाड्यातील कुस्तीपटूंना लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सकाळी दहा ते दोन यावेळेत स्थानिक मल्लांची कुस्ती स्पर्धा घेऊन त्यांना रोख रकमेची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मनसे केसरी 2024 च्या आयोजना संदर्भात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मंगळवेढा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, आखाडाप्रमुख मारुती वाकडे, मंगळवेढा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पैलवान दामोदर घुले, मनसे तालुकाध्यक्ष नारायण गोवे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, मुरलीधर सरकळे आदी यावेळी उपस्थित होते.

दिलीप धोत्रे यांनी यावेळी सांगितले की, ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपल्या हक्काचे मैदान मिळावे यासाठी मनसे केसरीचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून मी वाटचाल करीत इथपर्यंत पोहोचलो आहे. सामाजिक ऋण फेडण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करीत आहे. यंदा मंगळवेढा येथे होणारी मनसे केसरी 2024 हा सुद्धा एक सामाजिक बांधिलकीचाच भाग आहे. मंगळवेढा येथील मनसे केसरी स्पर्धा जीवात जीवमान असेपर्यंत घेण्याचा निर्धारही दिलीप धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला.

मनसे केसरी 2024 मध्ये पाच लाख रुपये बक्षीसासाठी दोन कुस्त्या होणार असून या महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे आशिष हुड्डा यांच्यात तसेच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व दिल्लीचा पैलवान दीपक कुमार यांच्यात रंगणार आहेत. दोन लाख रुपये बक्षीसासाठी माऊली जमदाडे व रोहित दलाल, एक लाख रुपये बक्षीसासाठी उमेश चव्हाण व संग्राम साळुंखे, तात्या जुमाळे व विजय शिंदे, पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीसासाठी ज्योतिबा आटकळे व संग्राम अस्वले, तर पन्नास हजार रुपये बक्षीसासाठी सौरभ घोडके व सुनील हिप्परकर यांच्यात कुस्त्या होणार आहेत.

या मैदानात प्रणित भोसले व सागर चौगुले, समाधान कोळी व सुमित आसवे, बालाजी मळगे व समर्थ काळे, विजय धोत्रे व अजय नागणे, कामण्णा धुमुकनाथ व राजेंद्र नाईकनवरे, दिग्वीजय वाकडे व अमर मळगे, सुनिल हिप्परकर व सौरभ घोडके, रणजित घोडके व शंकर गावडे, यश धोत्रे व शंतुनु शिंदे यांच्याही कुस्त्या कुस्ती शौकिनांना पाहण्यास मिळणार आहेत.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अर्जुन अवॉर्ड विजेते, हिंद केसरी, रूस्तम-ए-हिंद. महा सम्राट, कुस्ती सम्राट, भारत भीम, तसेच महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन, राष्टकुल सुवर्णपद विजेते, तसेच कुस्ती शौकीन, राज्याच्या विविध भागातील पैलवान उपस्थित राहून कुस्तीपटूना प्रोत्साहन देणार आहेत.

मोठे रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब मगर, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, कुस्तीसम्राट अस्लम काझी, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आखाडा प्रमुख म्हणून पैलवान मारुती वाकडे, पैलवान दामोदर घुले, पैलवान भिमान्ना माळी, पैलवान सोमनाथ सुर्वे, पैलवान महेंद्र देवकते हे काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी पैलवान धोत्रे (पंढरपूर) भ्रमणध्वनी क्रमांक 8668293908 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

कशी काळाची चाहूल आली ! लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक सचिन जवळकोटे यांच्या पत्नी सायली जवळकोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Next Post

भाजपला राज्यात मोठा धक्का ! भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदारानंतर पुण्यातील चिंचवडच्या विद्यमान भाजप आमदार अश्विनी जगताप भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेणार ?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group