news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

आमदार सुभाषबापूंनी सामाजिक वसा जपला : दत्तात्रय जमदाडे, लोकमंगल बँकेच्यावतीने मंगळवेढा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

टीम लोकमन by टीम लोकमन
June 26, 2025
in सामाजिक
0
आमदार सुभाषबापूंनी सामाजिक वसा जपला : दत्तात्रय जमदाडे, लोकमंगल बँकेच्यावतीने मंगळवेढा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

टीम लोकमन मंगळवेढा |

लोकमंगल समुहाच्या माध्यमातुन संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा लोकमंगल पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन दत्तात्रय जमदाडे यांनी केले. लोकमंगल बँकेच्या मंगळवेढा शाखेच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी व विविध स्पर्धा परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव दत्तात्रय जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना जमदाडे म्हणाले की, माजी सहकारमंत्री व आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकमंगल समुहाने महाराष्ट्रभर सहकाराचे जाळे विणले आहे. लोकमंगल संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निमिर्ती झाली असून नवीन व्यवसायिक व उद्योजक निर्माण झाले आहेत. सुभाषबापू यांच्या कुशल नेतृत्वात लोकमंगल परिवाराने आर्थिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चौफेर कामगिरी केलेली असून सोलापूर जिल्हयाच्या विकासात लोकमंगल समुहाचे योगदान मोठे आहे. याप्रसंगी त्यांनी लोकमंगल बँकेच्या प्रगतीचा व सामाजिक कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ ढेपे उपस्थित होते. यावेळी बोलताना ढेपे सरांनी अनेक उदाहरणांसहीत विद्यार्थ्याच्या व पालकांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक समीर इनामदार, शिक्षक नेते संजय चेळेकर, शुभम बर्गे, राधिका घोडके, ऋषिकेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अस्लेशा भोसले, वेदांत खराडे, आयुशी भुसे, शुभंम बर्गे, प्रणिती माने, श्रावणी पाटील, निकीता आवताडे, प्रणवी पाटील, मिजवा शेख, प्रतिक्षा चव्हाण, श्रेया माळी, राधिका घोडके, रेहान इनामदार, प्रणिती माने, प्रणाली कोंडुभैरी, वैष्णवी मोरे, भक्ती विराजदार, किर्ती गवळी, अजिंक्य मोरे, माधवी विले, प्रतिक्षा विराजदार, प्रियांशु माने, मकरंद ढेपे, ॲड. ऋषीकेश क्षिरसागर आदींचा गौरव करण्यात आला.

बँकेचे अधिकारी शिवाजी दरेकर यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यकमाचे सुत्रसंचलन राजेंद जाधव यांनी केले. उमेश काळे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यकमास शाखेचे शाखाधिकारी सचिन पलंगे कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वावचे, रमेश दत्तु, सुनीता शिंदे, सुहास शिंदे, विशाल शिंदे, धनश्री कोंडुभैरी, राहुल जगताप व सोमनाथ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

ऐकावं ते नवलचं ! आजीबाईंना टीव्ही सुरू केल्यावर दिसत होता साप, चॅनेल बदलले तरीही साप जात नव्हता ; नंतर समोर आले धक्कादायक सत्य, अजब घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

Next Post

धक्कादायक ! नामांकित विवाह संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल बनवून केली फसवणूक, सांगलीतील डॉक्टर तरुणीला घातला पावणेपाच लाख रुपयांचा गंडा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group