टीम लोकमन मंगळवेढा |
सप्तर्षी प्रकाशन आणि सप्तर्षी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या मातोश्री सौ. काशीबाई घुले स्मृती साहित्य पुरस्कार २०२३ साठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२३ या वर्षात प्रकाशित झालेले कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह आणि कृषी साहित्य या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात येणार आहेत. साहित्य कृती १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. लेखक तसेच प्रकाशकांनी पुस्तकासह लेखकाचा परिचय व छायाचित्र पाठवण्यात यावे.
ग्रंथ १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत सप्तर्षी प्रकाशन, दामाजी कॉलेज पाठीमागे, मंगळवेढा जि. सोलापूर ४१३३०५ या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन संपादक सप्तर्षी प्रकाशन मंगळवेढा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२१८८२९९२९५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.










