टीम लोकमन मरवडे |
ग्रामपंचायत मरवडे ता. मंगळवेढा यांचेवतीने जागतिक महिला दिनानिमित्त मरवडे येथे शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मरवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव यांनी दिली.
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मरवडे यांच्यावतीने शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी लतीफभाई तांबोळी मंगल कार्यालय मरवडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी दुपारी 2 वाजता महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर, महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व 2024-25 मध्ये जन्मलेल्या मुलींचा व त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम उपस्थित राहणार असून धनश्री पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या सुविद्य पत्नी अंजलीताई समाधान आवताडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. सुमय्या लतीफभाई तांबोळी उपस्थित राहणार आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय शिंदे, तालुका अभियान समन्वयक लिंगराज शरणार्थी, तालुका व्यवस्थापक विलास दुपारगुडे, प्रभाग समन्वयक सविता खुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) चे मंगळवेढा तालुकाध्यक्ष डॉ. अतुल निकम, त्वचारोग तज्ञ डॉ. रोहिणी अतुल निकम व स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनल महेश कोरे हे उपस्थित महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवारी दुपारी 3.15 वाजता तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा यांचेवतीने कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले असून या कार्यक्रमात उपस्थित महिलांना अल्पोपहार देण्यात येणार असल्याची माहिती मरवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दीक्षा शिवशरण यांनी दिली.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजना हरिदास चौधरी, उपसरपंच दीक्षा सुभाष शिवशरण, ग्रामपंचायत अधिकारी राखी सुनील जाधव, ग्रामपंचायत सदस्या सुमन लक्ष्मण गणपाटील, पुनम दौलत मासाळ, मीनाक्षी सिद्धेश्वर सूर्यवंशी, मीरा भारत जाधव, रेश्मा अश्विन शिवशरण, दिपाली समाधान ऐवळे, आनंदीबाई वासुदेव पोतदार, मालन उस्मान मणेरी आदि पदाधिकारी महिला प्रयत्नशील आहेत.
या कार्यक्रमासाठी मरवडे व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजना चौधरी, उपसरपंच दीक्षा शिवशरण, ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव व सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.