news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने 7 मार्चपासून मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन ; पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, राज्यातील दिग्गज कलावंतांची हजेरी

टीम लोकमन by टीम लोकमन
March 6, 2026
in सांस्कृतिक
0
छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने 7 मार्चपासून मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन ; पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, राज्यातील दिग्गज कलावंतांची हजेरी

टीम लोकमन मरवडे |

कुस्तीच्या आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मरवडे गावयात्रेला जोडूनच छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टीव्हल सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचा हा सोहळा दिनांक 7 मार्च ते 11 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार असून या निमित्ताने भरगच्च सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.

मागील 25 वर्षांपासून मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंतांचे माहेरघर म्हणून मरवडे फेस्टीव्हलची ओळख राज्यभरात निर्माण झाली असून या व्यासपीठावर आजवर शेकडो कलावंतांना सादरीकरणाची संधी मिळाली आहे. शनिवार दिनांक 7 मार्च रोजी मरवडे फेस्टीव्हलचा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील नामवंत कवींना निमंत्रण करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनासाठी दंगलकार नितीन चंदनशिवे, गुंजन पाटील, लता ऐवळे, प्रा. रोहीत शिंगे, इंद्रजित घुले, प्रा. रोहित देशमुख, वर्षा चौगुले, बदिउजमा बिराजदार, अँड. महादेव कांबळे, शिवाजी सातपुते, सुर्याजी भोसले यांना निमंत्रित करण्यात आले आहे .

रविवार दिनांक 8 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांचे जाणता राजा शिवछत्रपती या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे तिसरे पुष्प वाशिम येथील प्रसिद्ध प्रबोधनकार पंकजपाल महाराज हे दिनांक 9 मार्च रोजी गुंफणार आहेत. सामाजिक व्यंगावर प्रहार करणारा हा कार्यक्रम सप्तखंजिरी वादनाने अधिक रंगतदार ठरणार आहे. दिनांक 10 मार्च रोजी राम चौधरी निर्मित मराठमोळ्या लावण्या व आयटम साँगचा लावण्यरंग हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक 11 मार्च रोजी होणार असून मरवडे फेस्टीव्हलच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याची सांगता कोल्हापूर येथील माऊली संगीत सोंगी कलापथकाच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाने होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब सुर्यवंशी, प्रा. राजेश कुलकर्णी, सर्जेराव गणपाटील, अरुण सरडे, रावसाहेब जाधव, नवनाथ जाधव, सिद्धेश्वर रोंगे, विजय पवार, गिरीधर शिवशरण, सागर पवार यांनी केले आहे.

Previous Post

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने 7 मार्चपासून मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन ; पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, राज्यातील दिग्गज कलावंतांची हजेरी

छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने 7 मार्चपासून मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन ; पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, राज्यातील दिग्गज कलावंतांची हजेरी

March 6, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group