news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

संतभूमी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या मंगळवेढ्याची आता वृक्षभूमी म्हणून नवी ओळख निर्माण होईल : आमदार समाधान आवताडे, मंगळवेढ्यात वृक्षमहोत्सव २०२४ योजनेचा मोठ्या उत्साहात प्रारंभ

टीम लोकमन by टीम लोकमन
June 21, 2024
in सामाजिक
0
संतभूमी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या मंगळवेढ्याची आता वृक्षभूमी म्हणून नवी ओळख निर्माण होईल : आमदार समाधान आवताडे, मंगळवेढ्यात वृक्षमहोत्सव २०२४ योजनेचा मोठ्या उत्साहात प्रारंभ

टीम लोकमन मंगळवेढा |

शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या सचिवा डॉ. प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी हाती घेतलेले हे अभियान पोषक पर्यावरणाचे मोठे द्योतक आहे. संतभूमी म्हणून परिचय असलेल्या मंगळवेढा भूमीला वृक्षभूमी असा लौकिक मिळून ओळखली जाईल असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले. ते शुक्रवारी वटपौर्णिमा व योगदीन याचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष महोत्सव-२०२४ अंतर्गत दहा हजार झाडांचे वृक्षारोपण या पर्यावरण पूरक कार्याचा शुभारंभ  करताना बोलत होते.

यावेळी सिनेअभिनेते शंतनु मोघे, अजय तपकिरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, डॉ. मीनाताई कदम, डॉ. प्रियदर्शनी महाडिक, प्रा. तेजस्विनी कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, उद्योजक पवन महाडिक, श्रीधर भोसले, यतीराज वाकळे, प्राचार्य रवींद्र काशीद यांच्या उपस्थितीत व आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संत चोखामेळानगर येथील कृष्ण तलाव परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना, आमदार आवताडे यांनी हे अभियान लोकजागृतीच्या माध्यमातून गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करून जास्तीत-जास्त झाडांची निर्मिती करूया. तालुक्यात 45 हजार विद्यार्थी आहेत. आपण प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देणार असून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट साध्य करून जिल्ह्यात मंगळवेढा तालुका वृक्ष लागवडीमध्ये अग्रेसर ठेवूया असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थिताना केले.

या वृक्षलागवड मोहिमेच्या संकल्पक डॉ. प्रियदर्शनी महाडिक यांनी आपले विचार मांडताना महाराष्ट्रात तापमान वाढ होत असून सोलापूर जिल्हा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. श्रीमंतांना एअर कंडिशनची सुविधा आहे. मात्र गोरगरीब लोकांना झाडांचाच आधार आहे. यासाठी निसर्गामध्ये वृक्षारोपणाची संकल्पना पूर्ण करण्याचे ठरवले. येत्या वर्षभरात या ठिकाणी शासनाच्या आहेत त्या ठिकाणी पारंपारिक वृक्षारोपण करण्याची तुमची तयारी असून चिंच, पिंपळ, वड, लिंब, करंजी या झाडाचे मानवी आरोग्याला मोठे फायदे आहेत. भविष्यात यापासून उत्पादन निर्मिती होऊ शकते. आपल्या मंगळवेढ्याची ज्वारी जीआय मानांकनामध्ये असून अन्नप्रक्रिया उद्योगांमधून मंगळवेढ्याच्या ज्वारीला येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील. असा आशावाद यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला.

या कार्यक्रमास मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव, मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, संपादक दिगंबर भगरे, वारी परिवाराचे संस्थापक सतीश दत्तू, प्रफुल सोमदळे, ॲड. प्रकाश घुले, शाम पवार, चोखामेळानगरचे सरपंच शिवाजी सरगर, कैलास कोळी, आनंद मुढे, माऊली कोंडूभैरी, सुरेश मेटकरी यांचेसह प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षदिंडीने वेधले सगळ्यांचे लक्ष…

इंग्लिश स्कूल मंगळवेढा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी बनवून वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये ही दिंडी शहरातून चोखामेळा नगर येथील कृष्णा तलावाकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी इतकी आकर्षित होती की शहरातील नागरिकांचे लक्ष या दिंडीने वेधले होते.

Previous Post

कंधार शहरातील विजेचा लपंडाव वीज वितरण कंपनीने तातडीने थांबवावा ; शहर शिवसेनेच्या वतीने महावितरणला निवेदन देऊन केली मागणी

Next Post

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट ; नाथाभाऊ लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group