टीम लोकमन मंगळवेढा |
शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढाचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दि.१ मे ते शनिवार दि.४ मे या कालावधीत इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुजीत कदम यांनी दिली.
बुधवार दि.१ मे रोजी दुपारी १२.०० वा. दलितमित्र कदम गुरुजी यांच्या पूतळ्याचे पूजन व सर्व शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण सोलापूरचे डॉ.एन.बी.चव्हाण यांच्या हस्ते शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, डॉ.एम.ए.अनुसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
त्यानंतर शिवशंभो महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा व्दितीय वर्धापन दिन बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
गुरुवार दि.२ मे रोजी सकाळी ७.०० वा. कृषी क्रीडा ज्योत दौड व सायकल रॅली जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री महादेव बिले-कसगावडे यांच्या हस्ते स्व. कदम गुरुजी स्मारक ते ताडआप्पा मळा या दरम्यान होईल. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार राम नेहरवे, संचालक यतिराज वाकळे यांची उपस्थिती राहिल.
सकाळी ११.०० वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाचे उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांचे नवीन शैक्षणिक धोरणातील आव्हाने या विषयावर व्याख्यान होईल. एस.एच. गायकवाड यांच्या हस्ते व्याख्यानाचे उदघाटन होईल. अकलूजचे डॉ. दुर्योधन वाघमोडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव श्रीधर भोसले, उमेश बरचे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ॲड. शिवाजी पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दि.२ मे रोजी दुपारी ४.०० वा. संस्थांतर्गत मुलांच्या व मुलींच्या भव्य कुस्ती स्पर्धा होतील. माजी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उदघाटन होईल. डॉ. शिवाजीराव पवार, नामदेव पडवळे, दिगंबर भगरे, मारुती वाकडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती स्पर्धा होतील.
शुक्रवार दि.३ मे रोजी सकाळी ८.०० वा. उध्दव बिनवडे व ग्रुप वेळापूर यांचा गोंधळ कार्यक्रम होईल. सकाळी ९.०० वा. इंग्लिश स्कूल मंगळवेढाचे झांजपथक सादरीकरण होईल.
सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मंगळवेढा शाखा आयोजित सुत्रसंचालन कार्यशाळा (विनामुल्य) होईल. सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, निवेदक श्वेता हुल्ले यावेळी मार्गदर्शन करणार असून कार्यशाळेचे उदघाटन निवेदक भारत मुढे करतील. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, ए.डी.भालदार, तसेच शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. शरद शिर्के, डॉ.प्रिती शिर्के उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि.३ मे रोजी सकाळी ११.०० वा. सोलापूरच्या डॉ. नसिमा पठाण यांचे विदयार्थी, पालक, शिक्षक बदलत्या काळानुसार शैक्षणिक संदर्भ या विषयावर व्याख्यान होईल. याचे उदघाटन पुणेच्या डॉ. वृषाली पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडिक, संचालिका अजिता भोसले, डॉ. बाळासाहेब कोकरे, कोल्हापूरचे डॉ.जी.बी. कोळेकर, डॉ.एस.एस. कोळेकर उपस्थित राहतील.
शनिवार दि.४ मे रोजी सकाळी ९.०० वा. मंगळवेढयातील सर्व भजनी मंडळे तसेच श्री हनुमान भजनी मंडळ, आंबे चिंचोली यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवार दि.४ मे रोजी सकाळी १०.०० वा. माता पिता संस्थान खंडावे बु. ता. राहुरी जि. अहमदनगरचे अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर यांचे प्रबोधनात्मक किर्तन होईल. शनिवार दि.४ मे रोजी दुपारी १२.०० वा. पुष्पवृष्टी होईल. दुपारी १२.३० वा. महाप्रसाद होईल.
सदरच्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाषराव कदम, संचालिका डॉ. मिनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडिक, संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका अजिता भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक ॲड. शिवाजी पाटील, यतिराज वाकळे, ए.डी. भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य आर.एस. काशिद, वेळापूरचे प्राचार्य आर.बी. पवार, बेगमपूरचे प्राचार्य के. सी. भोसले, भोसेचे प्राचार्य जयराम आलदर, नरखेडचे मुख्याध्यापक अजित शिंदे, आंबेचिंचोलीचे एस.व्ही. बाबर, मुख्याध्यापक इंग्लिश स्कूल, उपमुख्याध्यापक मंगळवेढाचे सुनील नागणे, पर्यवेक्षक ई.एस. काझी, सुहास माने, डी.जे. चंदनशिवे, वेळापूरचे उपमुख्याध्यापक पी.एम. शिवशरण, वेळापूरचे पर्यवेक्षक बी.एस.सावळे, बेगमपूरचे पर्यवेक्षक व्ही.बी.फुगारे, इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मंगळवेढा, दलितमित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा, दलितमित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी, मंगळवेढा, शिवतेज प्राथमिक शाळा, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण प्रसारक मंडळ संस्था परिवार प्रयत्नशील आहेत.









