news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा बसस्थानक दिसणार आता नव्या रूपात, सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीतून होणार बसस्थानकाचा कायापालट ; आमदार समाधान आवताडे यांच्या दूरदृष्टीतून बसस्थानकाला मिळणार नवी झळाळी

टीम लोकमन by टीम लोकमन
July 4, 2024
in सामाजिक
0
मंगळवेढा बसस्थानक दिसणार आता नव्या रूपात, सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीतून होणार बसस्थानकाचा कायापालट ; आमदार समाधान आवताडे यांच्या दूरदृष्टीतून बसस्थानकाला मिळणार नवी झळाळी

टीम लोकमन मंगळवेढा |

नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा म्हणून अत्याधुनिक बसस्थानक निर्मितीच्या अनुषंगाने मंगळवेढा बसस्थानकाच्या आवारातील काँक्रिटीकरणाच्या व इतर सुधारणा विकास कामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून २ कोटी २८ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. या सर्व नियोजित विकास कामांचे भूमिपूजन आमदार समाधान आवताडे हस्ते नुकतेच करण्यात आले.

महाराष्ट्र शासन एसटी स्टॅन्ड धोरणात्मक विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे या निधीच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मतदारसंघातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मूलभूत आणि पायाभूत सुविधांचे काम सुरू असून लवकरच ती सर्व कामांचे लोकार्पण होतील. मतदारसंघाला विकासाच्या एका नव्या शिखरावर नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. अशी ग्वाही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

सदर नियोजित विकास कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश आमदार आवताडे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बसस्थानक निधी, ज्यादा बसेस मिळणे या विषयाबाबत आमदार आवताडे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी आढावा घेतला.

या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, आगार प्रमुख संजय भोसले, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कैलास कोळी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, भाजपाचे मंगळवेढा शहराध्यक्ष नागेश डोंगरे, सरपंच शिवाजी सरगर, युवराज शिंदे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. डी. सी.जाधव, नंदकुमार जाधव, संजय माळी, सचिन गोवे, सुशांत हजारे आदी मान्यवर तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातील व मंगळवेढा आगारातील अधिकारी व कर्मचारी तसेच चालक, वाहक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

डॉक्टर्स डे निमित्त उमदी येथे लायन्स क्लब ऑफ सांगली, उमदी प्राइड व उमदी लायन्स ग्रेप्स यांचेवतीने शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

Next Post

राज ठाकरेंचा जुना सहकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार? ‘मातोश्री’ वर राजकीय घडामोडींना वेग

Next Post
राज ठाकरेंचा जुना सहकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार? ‘मातोश्री’ वर राजकीय घडामोडींना वेग

राज ठाकरेंचा जुना सहकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार? 'मातोश्री' वर राजकीय घडामोडींना वेग

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group