टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराचा समारोप आज रविवारी मंगळवेढ्यात पदयात्रेने होणार आहे. या पदयात्रेत आमदार समाधान आवताडे, उमेदवार आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक सहभागी होणार आहेत.
आज रविवार दिनांक ५ मे रोजी दुपारी ३ वाजता दामाजी चौकातून या पदयात्रेस प्रारंभ होणार असून चोखामेळा चौकात पदयात्रेचा समारोप होणार आहे. भाजपने प्रचाराचा समारोप मंगळवेढा शहरात ठेवल्याने राम सातपुते शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे.
दामाजी चौकातून निघणाऱ्या पदयात्रेत माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे यांचेसह भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ३ वाजता निघणाऱ्या पदयात्रेचा समारोप सायंकाळी ५ वाजता श्री संत चोखामेळा चौकात होणार आहे. या पदयात्रेत मंगळवेढा शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राम सातपुते यांचा आज दिवसभर भेटीगाठींवर भर असून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत.











