आंधळगाव : गणेश पाटील
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथे महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळाचे ज्येष्ठ सदस्य धनंजय पाटील गुरुजी व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ॲड. शिवानंद पाटील यांचेहस्ते करण्यात आली. यावेळी लक्ष्मीदहिवडीचे सरपंच अनिल पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव मंडळ लक्ष्मीदहिवडी ता. मंगळवेढा यांचेवतीने महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक लक्ष्मीदहिवडी गावातून मोठ्या जल्लोषात वाचत गाजत काढण्यात आली. लक्ष्मीदहिवडीचे पोलीस पाटील मधुकर पाटील यांनी या मिरवणुकीसाठी विशेष सहकार्य केले. मिरवणुकीनंतर सचिन जुंधळे व किशोर जुंधळे यांनी सर्व भक्तांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली होती. महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष जालगिरे व उपाध्यक्ष संतोष विलास पाटील यांच्या नेतृत्वात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती उत्सवातील सर्व कार्यक्रम व मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन मनोहर पाटील, गणेश वसंत पाटील, महादेव स्वामी, नंदकुमार पाटील, औदुंबर पाटील, धनंजय विजय पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास मसरे, मनोहर नामदेव पाटील, संजय मेतकुटे गुरुजी, अनंत पाटील गुरुजी, बाबासाहेब पाटील, प्रदीप जालगिरे, ऋषिकेश पाटील, ओम स्वामी, समर्थ घोडके, अमोल कांबळे, सोमनाथ लिगाडे, सोमनाथ तोडकरी, सिद्धेश्वर कोष्टी, सरपंच अनिल पाटील, महेश पाटील, उमेश पाटील, मंगेश पाटील, विजय जालगिरे, बसवेश्वर पाटील, रामचंद्र पाटील सागर कोष्टी, राज पाटील, दयानंद लिगाडे, मनोहर लिगाडे यांचेसह लक्ष्मीदहिवडी ग्रामस्थ, परिसरातील नागरिक आणि लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.










